भारतात गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने बुस्टर डोसबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, येत्या 15 जुलैपासून देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत ‘बुस्टर डोस’ दिले जाणार आहेत.येत्या 15 जुलैपासून ही विशेष मोहीम सुरू होत असून, ती 75 दिवस राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत ‘बूस्टर डोस’ दिले जाणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी सरकारने अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलाय.
कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी साधारण 6 महिन्यांनी कमी होते. अशा वेळी त्यांना पुन्हा ‘बूस्टर डोस’ दिल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत होईल, असे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) व इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासात दिसून आले आहे.दोन डोसमधील कालावधी कमी - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यातच कोविड लसींच्या दुसऱ्या डोसमधील कालावधी 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केला होता. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारे मोदी सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मोदी सरकारने नागरिकांना 75 दिवसांसाठी मोफत ‘बूस्टर डोस’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 1 टक्क्यांहूनही कमी लोकांनी सशुल्क ‘बुस्टर डोस’ घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील नागरिक व फ्रंटलाईन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत ‘बुस्टर डोस’ मिळत होता.आतापर्यंत 60 वर्षे वा त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकांपैकी सुमारे 26 टक्के लाेकांना ‘बुस्टर डोस’ घेतला आहे.. तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस मिळाल्याचे आकडेवारी सांगते. आता सर्वांनाच मोफत ‘बुस्टर डोस’ मिळणार असल्याने लसीकरण मोहिमेला गती येण्याची चिन्हे आहेत.
येत्या 15 जुलैपासून ही विशेष मोहीम सुरू होत असून, ती 75 दिवस राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत ‘बूस्टर डोस’ दिले जाणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी सरकारने अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलाय.कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी साधारण 6 महिन्यांनी कमी होते. अशा वेळी त्यांना पुन्हा ‘बूस्टर डोस’ दिल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत होईल,
Published on: 14 July 2022, 04:11 IST