शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरु करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. सातारा जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात साडेपाच लाखांवर शेतकरी या योजनेचे लाभार्थी होते. मात्र शासकीय पातळीवर जेव्हा पात्र शेतकऱ्यांची कागदपत्रे छाननी करण्यात आले.
तेव्हा यातील अनेक शेतकरी अपात्र असल्याचे दिसून आले आहे. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता पंतप्रधान मोदी यांनी अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये एकट्या सातारा जिल्ह्यातील 73 हजार शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र आहेत.
त्याच्याकडून 100 कोटी वसूल केले जाणर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी अपात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 73, 000 इतकी आहे. यामध्ये आयकर भरणाऱ्यांचा जिल्ह्यातील आकडा 29 हजार 700 आहे.
केळीतील कंद पोखरणाऱ्या सोंड किडीचे नियंत्रण
सातारा जिल्ह्यात अपात्र आणि इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असे एकूण जवळपास 73 हजार शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी पात्र नसूनही ज्या 73 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाचे पैसे आले आहेत त्यांच्याकडून आता मोदी सरकार पैसे माघारी घेणार आहे.
केळीच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचा पुनर्विकास, आता शेतकऱ्यांची लाखोंची कमाई होणार
अपात्र शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेला निधी शासनाला परत भरला नाही तर महसूल वसुलीची कार्यपद्धती राबवून सरकार निधी वसूल करणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांनी कारवाई सुरु केली आहे. सध्या सदर शेतकऱ्यांना एक- एक नोटीस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
कोरफडीची शेती करून वर्षाला कमवा 10 लाख, जाणून घ्या शेती कशी करावी
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक दूध उत्पादनात 24% वाटा
अंडी-चिकन व्यवसायात दुप्पट नफा होणार, आजच RIR जातीची कोंबडी खरेदी करा
Published on: 08 February 2023, 04:08 IST