News

देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक योजना सुरू केल्या जात आहेत. ज्यांच्या मदतीने देशातील गरिबी कमी करण्यासाठी पर्यंत केले जात आहेत.

Updated on 18 February, 2022 5:25 PM IST

देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक योजना सुरू केल्या जात आहेत. ज्यांच्या मदतीने देशातील गरिबी कमी करण्यासाठी पर्यंत केले जात आहेत. आता केंद्र सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदारांची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा : आनंदाची बातमी: "या" कर्मचाऱ्यांना होळीच्या दिवशी मिळणार पैसे

युवा शेतकऱ्याने अवघ्या २४ व्यावर्षी शेतीत केले भन्नाट प्रयोग; २० लाखांचे मिळवले उत्पादन

पेन्शन कधी आणि कशी मिळेल

१. स्वतःचा व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणली आहे.

२. यामध्ये नोंदणी करण्यासाठी, तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

३. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

हे ही वाचा : शेतकऱ्याचा नादच खुळा! सोयाबीनचे शोधले नवे वाण, ही आहेत वैशिष्ट्ये

योजनेसाठी पात्रता आणि लाभ

१. या योजनेत नोंदणी केलेल्या व्यावसायिकाचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

२. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपये किंवा त्याहून कमी असावी.

३. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

४. जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरी किंवा नोकरी करत असेल आणि एकत्र व्यवसाय करत असेल. त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

१. एनपीएस नावनोंदणीसाठी तुमच्यासाठी ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

२. आधार कार्ड

३. बचत बँक खाते

४. जन धन खाते क्रमांक

योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही Labor.gov.in आणि maandhan.in वर लॉग इन करू शकता.

English Summary: Modi government will give pension to shopkeepers
Published on: 18 February 2022, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)