मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता वाहनचालकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. अनेकजण तर पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत तर कोणी अनेकजण खासगी वाहने टाळू लागले आहेत.
असे असताना आता याच वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान केंद्र सरकार समोर आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा तयारीत आहे.
केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकार आता महागाई आटोक्यात यावी यासाठी एका योजनेवर विचार करत आहे.
राज्यात सरकारी वाळूची ६५ डेपोची उभारणी, ऑनलाईन खरेदी करता येणार वाळू...
यात पेट्रोलवरील कर कमी करण्यासोबत खाद्यतेल आणि गव्हासारख्या अन्नधान्यावरील आयात शुल्क कमी होऊ शकते. सरकारी अधिकारी विविध मंत्रालयाच्या निधीमधून एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या नियोजनात व्यस्त आहे. गेल्या वेळी देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यात आले होते. २१ मे रोजी अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता.
लम्पी व्हायरसने अहमदनगरमध्ये 43 गुरांचा मृत्यू, राज्यात उडाली खळबळ..
यावेळीही सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करात मोठी कपात करण्याची शक्यता आहेत. केंद्र सरकारने कपात केल्यानंतर राज्यांवर कर कमी करण्याचा दबाव वाढणार आहे. त्यामुळे राज्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करा'
सरकारी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरु, आता कोटींमध्ये उलाढाल..
Published on: 18 August 2023, 02:50 IST