2014 साली देशात 70 वर्षांपासून सत्तारूढ असलेले काँग्रेस सत्ता बाहेर झाले आणि देशात भाजपाशासित मोदी सरकार उदयास आले. मोदी सरकार शासनात आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे, तर काही शेतकरी हिताच्या योजना शासनदरबारी विचाराधीन आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना संपूर्ण देशात राबविल्या आहेत.
मोदी सरकारने संपूर्ण देशात पीएम किसान सम्मान निधि योजना सारखी शेतकऱ्यांचे हित जोपासणारी योजना अमलात आणली. या योजना व्यतिरिक्त सरकारने पी एम किसान ट्रॅक्टर योजना देखील अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
पीएम किसान ट्रॅक्टर योजना
शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही. आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देशातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना ही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू पी एम किसान ट्रॅक्टर योजना अंमलात आणल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना शेती कार्य करण्यासाठी, शेतीमध्ये कुठल्याही पिकाच्या लागवडीची पूर्वमशागत पासून ते काढणी करण्यापर्यंत ट्रॅक्टर खूप उपयोगात येते, यामुळे शेतीचे कामे वेळेत होतात तसेच यामुळे उत्पादनात वाढ देखील होते.
परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो त्यांना भाडेतत्वावर ट्रॅक्टर आनंद शेतीची पूर्वमशागत तसेच विविध शेत कार्य पार पाडावी लागतात तर काही शेतकरी बैलांच्या साह्याने शेतीची पूर्वमशागत व इतर शेत कार्य करतात, मात्र या पारंपारिक शेती पद्धती मुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन पदरी पडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील मोदी सरकार गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत मदत करणार आहे.
किती मिळणार सबसिडी
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत ट्रॅक्टर उपलब्ध होऊ शकते. गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी प्रदान करत असते. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकते, ट्रॅक्टरची अर्धी किंमत केंद्र सरकारद्वारे अनुदान मार्फत दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजने व्यतिरिक्त देशातील अनेक राज्य सरकारे संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान देत असते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मात्र एक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठीच अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल आपणास काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, बँकेचे पासबुक तसेच बँकेचे स्टेटमेंट देखील लागणार आहे, याव्यतिरिक्त आपले पासपोर्ट साईज फोटो देखील अनिवार्य आहेत. शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर त्यासाठी आपणास एप्लीकेशन सादर करावे लागेल त्यासाठी आपण आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्रात जाऊन एप्लीकेशन करू शकता.
Published on: 14 February 2022, 10:45 IST