News

नवी दिल्ली - वेळेवर शेतकऱ्यांकडे पैसा नसला तरी शेतीची कामे पुर्ण व्हावीत, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवली आहे. हातात पैसा नसला तर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकारकडून किंवा खासगी संस्थेकडून मोठ्या व्याजदरावर कर्ज घ्यावे लागते.

Updated on 18 May, 2020 4:50 PM IST


नवी दिल्ली - वेळेवर शेतकऱ्यांकडे पैसा नसला तरी शेतीची कामे पुर्ण व्हावीत, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवली आहे. हातात पैसा नसला तर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकारकडून किंवा खासगी संस्थेकडून मोठ्या व्याजदरावर कर्ज घ्यावे लागते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत असतो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी आत्मनिर्भर व्हावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड फार फायदेशीर आहे. दरम्यान आताच्या मोदी सरकारने क्रेडिट कार्डची नियम आणि त्यावरी मिळणारे कर्ज स्वस्त केल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारने गेल्या दोन महिन्यात २५ लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची (Economic package) घोषणा केल्याची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली. नव्या २५ लाख क्रेडिट कार्डवर २५ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज भेटणार आहे. कृषी मंत्रालयाच्या सुत्रानुसार, केसीसी धारकांची संख्या सव्वा सात कोटी झाली आहे. फक्त ४ टक्के व्याजावर शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होत असतो.   दरम्यान हे कार्ड बनविण्यासाठी लागणारे प्रोसेसिंग फीस (KCC Waive off Processing Fees other Charges),  इंस्पेक्शन आणि  लेजर फोलियो चार्ज सरकारने आधीच रद्द केले आहेत. कोणती बँक आपल्याकडून अशाप्रकारची फी घेत असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते. किसान क्रेडिट कार्डवर साधरण तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळते. तर एक लाख ६० हजार  रुपयांच्या कर्जाला कोणताच पुरावा देण्याची गरज नसते.  

जर आपल्याकडे शेती आहे, तर आपण जमिन न तारण देता १लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकता. दरम्यान पशुपालक आणि मत्स्यपालकांही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २ लाख रुपयांचे कर्ज फक्त ४ टक्के व्याजदरावर मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी ९ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. परंतु सरकार त्यावर २ टक्के अनुदान देत असते. यामुळे त्याचे व्याजदर हे ७ टक्के पडते. परंतु जर शेतकऱ्यांनी ते वेळेवर परत केले तर ३ टक्क्यांची सूट मिळत असते. यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के व्याजदर राहत असते.

क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :

क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड,  मतदान कार्ड, आदी.  अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल.  स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.

ऑनलाईन करा अर्ज

 https://pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जो या योजनेचा लाभार्थी नाही तोही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकता.  या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. अर्ज मिळवू  शकता.

English Summary: modi government give 25 lacs kisan credit card in two months
Published on: 18 May 2020, 03:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)