News

नेहमी निसर्गाच्या अनिश्चितेमुळे नुकसानाचा मार खाणाऱ्या शेतकऱ्याला आता कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले असून त्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. यामुळे शेतीचे कामे अजून खोळंबतील या चिंतेने शेतकरी व्याकुळ झाला आहे. परंतु मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निणर्य घेतला आहे.

Updated on 09 April, 2020 6:56 PM IST


नेहमी निसर्गाच्या अनिश्चितेमुळे नुकसानाचा मार खाणाऱ्या शेतकऱ्याला आता कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले असून त्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे.   यामुळे शेतीचे कामे अजून खोळंबतील या चिंतेने शेतकरी व्याकुळ झाला आहे. परंतु मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निणर्य घेतला आहे.  आपल्या शेतीच्या समस्येचे निरसन किंवा शेतीची कामे करण्यासाठी कृषी विभागात जाऊ शकत नाहीत किंवा कृषी विज्ञान केंद्रात देखील जाऊ शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने धावू आले आहे.

सरकारने किसान कॉल सेंटर चालू ठेवले आहे. पिकांची कापणी आणि पेरणी वेळेवर करावी लागेल, अशा परिस्थितीत किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे.  कॉल सेंटरच्या नंबरला कृषी शास्त्राज्ञांच्या वैयक्तिक मोबाईलवर डायव्हर्ट करण्यात आले आहे.  जेणेकरुन ते घरी बसून शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतील.   केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मते, साधारण २० हजार शेतकरी शेतीसाठी फोन करुन वैज्ञानिकांचा सल्ला घेत आहेत.   देशात २१ किसान कॉल सेंटर असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत आपण कॉल करुन आपल्या शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकता.  फार्म टेली अडवायझर आपल्या प्रश्नांचे उत्तर देईल,  यासाठी लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे १८००१८०१५५१ वर कॉल करू शकता.

दरम्यान सुमारे १२५ कृषी तज्ञ किसान कॉल सेंटरमध्ये कॉल रिसिव्ह करतात आणि समस्या सोडवतात.  हे तज्ञ फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रेशीम पालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय, बायोटेक्नॉलॉजी, गृह विज्ञानात पीजी किंवा डॉक्टरेट आहेत, जर आपण किसान कॉल सेंटरमध्ये आपली समस्या घेऊन कॉल केला. पण  आपला कॉल कोणी घेतला नाही तर सेंटरमधून परत शेतकऱ्यांना कॉल केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मजकूर संदेश किंवा व्हाईस मेसेजेस पाठविले जातात.  मोबाईलवर माहिती मिळविण्यासाठी नोंदणी  - शेतकरी ५१९६९ किंवा ७७८२९९८९९ वर एसएमएस पाठवून नोंदणी करु शकता. किसान GOV REG < नाव > , < राज्याचे नाव >,  < जिल्ह्याचे नाव >,  < ब्लॉकचे नाव > , असा संदेश  वरती दिलेल्या नंबरवर पाठवू शकता.  इंटरनेट जाणकारांसाठी  - http://mkisan.gov.in/hindi/wbreg.aspx या संकेतस्थळावर आपण नोंदणी करू शकता.

English Summary: modi government : farmers problem will solve on on phone
Published on: 09 April 2020, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)