पुणे : यावर्षी केंद्र सरकारने रेकॉर्ड ब्रेक गहू आणि आणि तांदळायची खरेदी केल्या केली असल्याचे सरकारकडून कळवण्यात आले आहे. यावर्षी गव्हाची ३८ दशलक्ष टन तर तांदळाची ५० दशलक्ष टनाची खरेदी झाली आहे.
ही आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक खरेदी आहे. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी केली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे लोकांना खायला अन्न नाही. अशावेळी सरकारने जनतेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची होत जाणारी परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित पैसे मिळत नसताना सरकारने जर माल खरेदी केला तर शेतकरीवर्गाला अधिकचे पैसे मिळू शकतात, हा विचार करून शेतकऱ्यांकडून मोदी सरकारने अधिक धान्य घेतले आहे.
Published on: 03 August 2020, 04:16 IST