News

साखर उद्योगाबाबत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने ६० लाख साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबर २२ ते ३१ मे २०२३ या मुदतीकरिता हा कोटा (Sugar Export Quota) आहे.

Updated on 07 November, 2022 11:11 AM IST

साखर उद्योगाबाबत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने ६० लाख साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबर २२ ते ३१ मे २०२३ या मुदतीकरिता हा कोटा (Sugar Export Quota) आहे.

यामध्ये आता प्रामुख्याने केंद्राच्या निकषानुसार महाराष्ट्रातून सुमारे २० लाख टन साखर निर्यात होऊ शकते. उत्तर प्रदेशाला ही जवळपास इतकाच कोटा आहे. यावर्षी देखील महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निर्यात होईल, असे म्हटले जात आहे.

याबाबत केंद्रीय खाद्य मंत्रालयाने (Food Ministry) परिपत्रक जारी केले. देशातील कारखाने गेल्या तीन वर्षांच्या साखर उत्पादनाच्या (Sugar Production) १८.२३ टक्के एकसमान निर्यात करू शकतात, असे म्हटले आहे. यामध्ये ज्या कारखान्यांना साखर निर्यात करायची नाही ते साखर कारखाने कोटा एक्स्चेंज करू शकतात.

वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

तसेच ज्यांना साखर निर्यात करायची नाही त्यांनी ६० दिवसांच्या आत कोटा एक्स्चेंज करावा. ज्यांना साखर निर्यात करायची नसेल त्यांनी याच कालावधीत केंद्राला या बाबत कळवावे. तसेच कोटा परत करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

गुजरातमध्ये उसाला 4700 भाव, मग महाराष्ट्रात 2900 एफआरपी का?

तसेच कच्च्या साखरेसह अन्य सर्व प्रकारची साखर निर्यात करता येणार आहे. केंद्राला निर्यातीची दररोज माहिती मिळावी यासाठी दररोज याची नोंद ऑनलाइन ठेवण्याचेही केंद्राने म्हटले आहे. यामुळे दर कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेवग्याच्या झाडाची पाने आहेत खूपच फायदेशीर, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
दूध धंदा पुन्हा आणतोय शेतकऱ्यांना अच्छे दिन! जनावरांच्या किमतीत वाढ..
शेतकऱ्यांनो गव्हाच्या 'या' जाती ठरत आहेत वरदान, शेतकरी बनतील लखपती..

English Summary: Modi government allowed 60 lakh tonnes of sugar export
Published on: 07 November 2022, 11:11 IST