News

राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावासाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होईल. येत्या ते चार राज्यातूनही मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे.

Updated on 21 October, 2020 10:55 AM IST


राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावासाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होईल. येत्या ते चार राज्यातूनही मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान आज पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक,पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसात उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यंत कमी - अधिक स्वरुपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून ऑक्टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढ- उतार होत आहे. तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह सरी पडतील.

English Summary: Moderate rainfall is forecast in many parts of the state
Published on: 21 October 2020, 10:55 IST