नवी दिल्ली: अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यातल्या सहकार्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भारत आणि जपान यांच्यात अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यामुळे उभय देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगाला याचा लाभ होणार आहे. दोनही देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या उत्तम प्रथा जाणून त्यांना प्रोत्साहन मिळायला आणि अन्न प्रक्रिया क्षेत्र अधिक सुधारण्याला यामुळे मदत होणार आहे. त्याच बरोबर बाजारपेठेपर्यंत पोचायलाही मदत होणार असून त्यामुळे समावेशकता साध्य होणार आहे. कल्पक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया यांची माहिती मिळाल्याने देशातला अन्न प्रक्रिया उद्योग अधिक दर्जेदार व्हायला या सहकार्य करारामुळे चालना मिळणार आहे. उत्तम पद्धती आणि बाजारपेठेसाठी वाव मिळाल्याने देशातला अन्न प्रक्रिया उद्योग वृद्धिंगत व्हायला मदत होणार आहे.
Published on: 25 January 2019, 08:33 IST