सध्या लग्नाचा प्रश्न हा खूपच अवघड होत चालला आहे. चांगलं शिक्षण, नोकरी असूनही अनेक तरुण मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. त्यात शेतकरी नवरा नको ग बाई अशी अनेक मुलींची इच्छा असते. त्यामुळे अनेक युवक चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत असूनही लग्न जुळत नसल्याने त्रस्त आहेत. त्यामुळेच खुलताबाद तालुक्यातील एका युवकाने चक्क कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनाच मुलगी पाहण्याची विनंती केली.
लग्न (Marraige) जुळत नसलं तर मित्र परिवाराला, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना मुलगी आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने चक्क कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे. याची आता ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रचंड व्हायरल झाली आहे.
यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. औरंगबादमध्ये हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सद्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान आता अशाच एका लग्नाळू तरुणाने मुलगी मिळत नसल्याने चक्क आमदारालाच फोन लावून, तुमच्या मतदारसंघात मुली पाहा अशी गळ घातली. दरम्यान, त्याचे झालं असे की, औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांना खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला.
घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेती देखील आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुखः व्यक्त केलं. तर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना अशी मागणी केली. यावर राजपूत यांनी देखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या;
बीन्सच्या शेतीतून मोठी कमाई, अवघ्या 6 महिन्यांत 13 लाखांपर्यंतचा नफा..
कृषी क्षेत्रातील पायाभूत कामांसाठी पतपुरवठा सुधारा, रिझर्व्ह बॅंकेने इतर बॅंकांचे टोचले कान...
मुख्यमंत्र्यांची शेंद्रीय शेती! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात..
Published on: 10 January 2023, 06:02 IST