Water Issue News : मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जायकवाडी धरणात फक्त 47 टक्के पाणीसाठा उरलेला असून सध्या मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्केसाठा उपलब्ध असून या धरणांमधुन पाणी सोडण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण आणि प्रशांत बंब यांनी धरण प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
17 ऑक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक होणार आहे. समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठकीनंतर मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी तात्काळ सोडण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण आणि प्रशांत बंब यांनी केली आहे.
सध्या गोदावरी नदीपात्रात पाणी असून त्यामुळे आता पाणी सोडले तर पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच जास्तीत जास्त पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचेल, असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले आहे. तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांनी पत्र पाठवून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
Published on: 16 October 2023, 12:18 IST