कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्यापासून 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान २९ एप्रिल ला सुरु होणार असून २३ मे पर्यंत हे अभियान चालणार आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविले जाणार आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील होणार असल्याचे सांगितलं जात आहे.
सध्या राज्यात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांसमोर, युवकांसमोर अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचं प्रमाण, शैक्षणिक समस्या,दरवाढ, अवकाळी पावसाने केलेल्या हंगामी पिकांचे नुकसान, लोडशेडींग,शैक्षणिक समस्या,रखडलेल्या भरती, दरवाढ,स्पर्धा परीक्षांचा प्रश्न असे एक ना अनेक समस्या आहेत या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
या अभियानातून शेतकऱ्यांसमोरील समस्या, कोरोनाच्या काळात दुर्लक्षित झालेले शेतकरी, मजूर, उद्योजक, तरुण पिढी यांच्या समस्या, शेतकरी आत्महत्या, तरुण आत्महत्या यांसारख्या गंभीर समस्या, युवकांच्या शैक्षणिक आणि नोकरीविषयीच्या समस्या शिवाय आरोग्याचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, याबाबत माहिती घेणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
या अभियानाच्या प्रक्रियेत अशा समस्या जाणून घेण्यासाठी दिवसातून तीन चार वेळा बैठका घेण्यात येणार असून दिवसातून एक दोन गावात जाहीर सभा भरवल्या जाणार आहेत. पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. या अभियानाचा पहिला टप्पा उद्या होणार असून उद्यापासून सुरु झालेले हे अभियान २३ मे पर्यंत चालणार आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २३ मे ला माढा तालुक्यात या अभियानाचा समारोप होणार आहे. २३ मे ला तुळजापुरात तुळजा भवानीचे दर्शन घेऊन घोषवारा मांडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
तरुण शेतकऱ्याची यशोगाथा; इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने केली शेती
कृषी कृषीपंपासाठी केली वीज चोरी;सहा शेतकऱ्यांवर झाली दंडात्मक कारवाई
Online Cow Dung Bussiness: गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती
Published on: 28 April 2022, 12:15 IST