उन्हामुळं साठवणूक केलेला कांदा सडू लागला, शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान
१. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आशोक सरगर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती समोर आणली आहे. शासनासहित निसर्ग सुद्धा कोपला अशी दुःखद भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल, शेतकऱ्यांचं निवेदन न घेतल्यानं शेतकरी संतप्त
२. अकोल्याच्या तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात काही शेतकरी त्यांच्या गाडीसमोर तळ ठोकून बसले आहेत. शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता समोर आली असून बसा तिकडेच, म्हणत आमदार रोहित पवार दुसर्या गाडीत बसून निघून गेले असा आरोप त्यांनी केला आहे.
साध्या भोळ्या शेतकऱ्यांचं साधं निवेदन पण हातात न घेणारा आमदार कशाला पाहिजे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याचा प्रश्नासंदर्भात ग्रामस्थ रोहित पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रश्न न सुटल्याने शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी गाडी आडवली. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार रात्री उशिरा पुन्हा त्या गावात आले. आणि त्या शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांची नाराजी दूर केली.
३. आता एक महत्वाची बातमी
म्हैसवर्गीय जनावरांचा बुधवारी म्हणजेचच २४ तारखेला जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,कृषिनगर, अकोला येथील पुर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र येथे बुधवार दि. 24 मे रोजी सकाळी 10 वाजता निवडक म्हैस वर्गीय जनावरांचा जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
जनावरे पाळण्यास इच्छुक पशुपालक व शेतकरी यांनी आपला सातबारा उतारा व आधार कार्डची प्रत सादर करुन या लिलावात सहभागी होऊ शकता. तसेच शेतकरी व पशुपालक, दुग्धव्यावसायिक यांनी लिलावात सक्रिय सहभाग घ्यावा. लिलावा संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. दिलीप बदुकले (9552794560) यांच्याशी तुम्ही या दिलेल्या नंबर वरून संपर्क करू शकता, असे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी केले आहे.
भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत, रविकांत तुपकर राज्य सरकारवर आक्रमक
४. टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकर्यांवर फार बिकट वेळ ओढावली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांच्या टोमॅटोच्या शेतात भेट दिली.
त्यांनी २ एकर शेतात २ लाख रुपये उत्पादन खर्च लावून टोमॅटोची लागवड केली आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने काबाडकष्ट करून मेहनतीने टोमॅटोचे पीक घेतले मात्र मार्केटमध्ये नेण्याचा खर्चही निघत नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडली पाहुयात ...
विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
५. 22 ते 24 मे दरम्यान वादळ आणि विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात पडेल. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात उष्णतेचा झळा जाणवणार आहेत. कोकणात उन्हाचा कहर पाहायला मिळणार आहे.
अधिक बातम्या:
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये ३२ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही; यामध्ये तुमचे तर नाव नाही ना? ही बातमी वाचाच...
पुढील तीन दिवसात राज्यातील 'या' भागात जोरदार पाऊस पडणार
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्य तेलाच्या किमतीत कपात, जाणून घ्या ताजे दर
Published on: 21 May 2023, 12:51 IST