शेतकऱ्यांना फक्त पाणी आणि चांगली जमीन असेल तर ते चांगल्या प्रकारे शेती करतात. अनेक ठिकाणी दुष्काळी भागात आपण बघतो की चांगल्या जमिनी आहेत, मात्र पाणी नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी चांगले राज्यकर्ते आणि ईच्छाशक्ती हवी असते. अनेक नेते आपल्या भागाचा विकास करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात. असेच काहीसे संपतराव देशमुख यांनी १९९५ मध्ये केले होते. यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
१९९५ साली पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा पराभव करत संपतराव देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. यानंतर राज्यात देखील काँग्रेसचा पराभव झालेला आणि शिवसेना भाजप युतीची सत्ता स्थापन होण्यासाठी शक्यता निर्माण झाली. यामुळे अपक्ष आमदारांचे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
यावेळी अपक्ष आमदारांनी शिवसेना भाजप युतीला मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अपक्ष आमदारांपैकी संपतराव देशमुख यांना मंत्रीपद देतो असं आश्वासन युतीचे नेते द्यायला लागले. यामुळे आता ते मंत्रिपद घेणार अशी चर्चा तालुक्यात रंगली होती. मात्र तेव्हा संपतराव अण्णा म्हणाले, मला मंत्री करू नका. पण मी ज्या भागातून आलोय त्या भागातील पाणी योजनांना निधी द्या. मला मंत्री होण्यासाठी जनतेने निवडून दिले नाही तर त्यांना पाणी हवे आहे, कसलाही विचार न करता त्यांनी हे सांगून टाकले.
अजित पवारांच्या घराबाहेरील झाडांच्या फांद्या तोडण पडले महागात, गुन्हा दाखल
यामुळे त्यांनी मंत्रीपदाची ऑफर नाकारली. १९९५ साली मंत्री होणं शक्य असतानाही त्यांनी मंत्रीपद नाकारले. गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार आणि घोडेबाजार हा शब्द अनेकदा आपण ऐकत आहोत, पण असेही काही आमदार होते, की ते सत्ता मंत्रीपद याच्या मागे न धावत केवळ लोकांसाठी काम करत होते. यामुळे असे अनेक आमदार लोकांच्या कायम मनात राहतात.
महत्वाच्या बातम्या;
पुढील ऊस गाळप हंगामात मोठे बदल, अतिरिक्त उसामुळे सरकारचा निर्णय
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..
या नोटा तुमच्याकडे आहेत? असतील तर तुम्ही लखपती झालाच, याठिकाणी मिळतात लाखो रुपये..
Published on: 17 June 2022, 12:20 IST