मुंबई
आरोग्य मंत्रालय दिल्यामुळे मंत्रिपदाचा दावा सोडत असल्याचे प्रहाराचे नेते बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. याबाबत आमदार कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
शिंदे- फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच आमदार कडू यांनी देखील वारंवार आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आहेत. तसंच सध्या असणाऱ्या सरकारमधील आमदारांचीही मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडत आहे, असं मी आज जाहीर करतो. मला दिव्यांग विभागाचं काम दिलंय. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडलाय, असंही कडूंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार रवी राणांनी उत्तर दिलं आहे. आमदार कडू काय बोलतात याबाबत मला माहिती नाही पण त्यांचा पक्ष आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे, असं रवी राणा म्हणालेत.
Published on: 18 July 2023, 01:58 IST