महाराष्ट्रामध्ये 2021 या वर्षाच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती व त्यासोबतच फेब्रुवारीतदेखील अवकाळी पावसामुळेपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
परंतु अजूनही बरेच शेतकरी यामध्ये झालेल्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तरया जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होते.त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांसाठी 12 कोटी 24 लाख सात हजार रुपये पद्धतीने अपेक्षित असताना सरकारी यंत्रणेच्या चुकीमुळेया तालुक्यांना अजूनही नुकसान भरपाईची मदत मिळाली नसून येथील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित राहिला आहे.यामध्येजिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुकास्तरीय यंत्रणांकडून नुकसान भरपाई विषयाची आकडेवारी दिली गेलीया आकडेवारीत खूप मोठी तफावतआहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर चांदवड तालुक्यात70 मिमी पाऊस होऊनही यंत्रणेने केवळ 35.8मिमी पाऊस दाखवला आहे.त्यावेळी गुलाबी चक्रीवादळाचा तडाखा बसला तेव्हा अतिवृष्टी होऊनही जवळ जवळ तीस ते चाळीस मिमी पाऊस झाल्याचे नमूद केले आहे.या दोन्ही तालुक्यांच्या अगदी शेजारीमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांचेमतदार मतदार संघ असलेले तालुके आहेत.या तालुक्यांमध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे आहेत.तहसील कार्यालयाने चुकीची माहिती दिल्याने हा सगळा घोळ झाला आहे.या सगळ्या प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली.यावेळीजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून भरपाई बाबत निर्णय घेऊ.मात्र एनडीआरएफच्या निकषात बसत नसेल तर भरपाई मिळणार नाही असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी सभागृहात रमेश बोरनारे यांनी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या विहिरींचा मुद्दा उपस्थित केला तसेच बंधारे देखील वाहून गेल्याने जमीन खरडून गेली आहे.शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळावी अशी मागणी केली.याशिवाय बागलान चे आमदार दिलीप बोरसे यांनी आरली द्राक्षांच्या नुकसानीचा देखील मुद्दा उपस्थित केला. यामध्ये पाच ते सात हजार कोटींचे नुकसान झाले असताना केवळ दीड कोटी रुपयांची भरपाई मिळाली.(स्रोत-अग्रोवन)
Published on: 11 March 2022, 02:35 IST