News

राज्यात गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना या महामारी मुळे अनेक महिलांना वैधव्य आले.अनेक महिलांना असे अकाली वैधव्य आल्यामुळे त्यांचा जगण्याचा प्रश्नम निर्माण झाला आहे.

Updated on 30 August, 2021 1:23 PM IST

 राज्यात गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना या महामारी मुळे अनेक महिलांना वैधव्य आले.अनेक महिलांना असे अकाली वैधव्य आल्यामुळे त्यांचा जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 अशा बिकट परिस्थितीत या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी दिलीआहे.

 याबाबतीत श्रीमती यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची एकूण संख्या पंधरा हजार 95 इतकी आहे. त्यापैकी जिल्हा कृती दलाकडे यादी तयार असलेल्या महिलांची संख्या 14 हजार 661 आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी 18 प्रकारच्या विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला आणि बालविकास विभागामार्फत सुरू आहे.

यामध्ये संजय गांधी निराधार योजने पासून अनेक योजनांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागातील या महिलांसाठी घरकुल योजनेत कशा पद्धतीने फायदा मिळवून देण्यात येईल, याबाबत वात्सल्य मिशन अंतर्गत काम सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

 मिशन वात्सल्य मोहिमेअंतर्गत विभागाने दाखल केलेले अर्जांची संख्या

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनासाठी 71 अर्जभरून घेण्यात आले आहेत.
  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 8600 61 महिला  कडून अर्ज दाखल करून घेतले आहेत.

 

  • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी 405 अर्ज दाखल झाले.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळावा यासाठी 1209 महिलांकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत.
  • या सर्वांचे एकूण संख्या पाहता वात्सल्य मिशन योजना अंतर्गत आतापर्यंत दहा हजार 349 महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहे.

संदर्भ – टीव्ही नाईन मराठी

 

English Summary: mission vaatsalya mohim for widow women by state gov.
Published on: 30 August 2021, 01:23 IST