मागील काही दिवसांपूर्वी कृषी पंपांचे थकीत वीज बिल विरोधात महावितरणने कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडीत करण्याचेमोहीम हाती घेतली होती व त्यासोबत थकबाकी वसुलीसाठी मोहीम देखील राबवण्यात आली होती.
त्यानंतर त्याचे संतप्त पडसाद राज्यासोबतच विधानसभेत देखील उमटले होते. हा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठ्या प्रमाणात लावून धरला होता. त्यामुळे शासनानेपुढील तीन महिन्यापर्यंत वीज कनेक्शन खंडित करू नये अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर काही आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सद्यपरिस्थितीत तोडण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.
यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीचा जाब विचारला. त्यांनी भर आढावा बैठकीतच महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना याबाबतचा प्रश्न विचारला की शासन निर्णय शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडायची नसतानाही वीज कनेक्शन का तोडण्यात आली? असा प्रश्न त्यांनी केला. या प्रश्नाला उत्तर देतांना कार्यकारी अभियंता त्यांनी उत्तर दिले की आंबा पीक हे शेती प्रकारात येत नसून ते हार्टीकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ही वीज तोडण्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे आंबा हे पीक शेती प्रकारात येत नाही हा जावईशोध कसा लावला? असा प्रश्न उदय सामंत यांनी त्यांना विचारला व तात्काळ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना फोनवरून संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली.
नंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तोडलेली वीज कनेक्शन आजच्या हात जोडून देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले आणि एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अमलात न आणता शासनाची भूमिका काय आहे ती भूमिका बजवावी अशी समज देखील त्यांनी दिली.
Published on: 18 April 2022, 09:21 IST