News

जागतिक जल दिनानिमित्त शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुल येथून सुरुवात होऊन संत गजानन महाराज मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Updated on 25 March, 2025 2:21 PM IST
AddThis Website Tools

छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनाद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचा सहयोग आवश्यक आहेअसे आवाहन पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज येथे केले.

जागतिक जल दिनानिमित्त शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुल येथून सुरुवात होऊन संत गजानन महाराज मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरजिल्हाधिकारी दिलीप स्वामीअपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारीनिवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरउपजिल्हाधिकारी उमाकांत पारधीउपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसलेसामाजिक वनिकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडेजिल्हा क्रीडा अधिकारी संभाजी देसाईजिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुखस्टरलाईट चे मिलिंद पाटीलग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयासजिल्हा समन्वयक किरण बिलोरे यांसह विविध विभागांचे अधिकारीसामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले कीमराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असूनत्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जलसंकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेतअसे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपसिंग बयास यांनी केले. सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल यांनी केलेतर आभार प्रदर्शन किरण बिलोरे यांनी केले.

English Summary: Minister of State Meghna Sakore Bordikar said everyone's cooperation is necessary to solve the water crisis
Published on: 25 March 2025, 02:21 IST