News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी चा सात वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशभरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. मात्र त्यातील 1.44 कोटी शेतकऱ्यांना अर्ज करूनही संबंधित योजनेचा लाभ मिळालेला नाही.

Updated on 06 January, 2021 11:26 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी चा सात वा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशभरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. मात्र त्यातील 1.44 कोटी शेतकऱ्यांना अर्ज करूनही संबंधित योजनेचा लाभ मिळालेला नाही.

शेतकऱ्यांनी जमा केलेली कागदपत्रे जसे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये सारखेपणा ना आढळल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या संबंधित कागदपत्रांची माहिती एकमेकांशी विसंगत येत असल्याने त्या शेतकऱ्यांच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन करण्यात आलेले नाही.या संकेतावर अधिक माहितीसाठी क्लीक करा 

हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

 ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कागदपत्रांमधील विसंगतता अन स्पेलिंग मध्ये चुका असतील तर त्यांना आधार मधील माहिती दुरुस्त करावे लागेल. त्यानंतर नवीन आधार कार्ड किसान सन्मान योजनेचा पोर्टलवर अपडेट करावे लागेल. किसान सन्मान योजनेची लिंक ओपन केल्यानंतर त्यामध्ये असलेल्या फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर जाऊन त्यात असलेल्या एडिट आधार डिटेल्स हा पर्याय निवडावा.

त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून त्यानंतरचा कॅपटचा कोड टाकावा लागेल. किंवा जर नावा मध्ये चुकी असेल तर तितकी वेबसाईटवर दुरुस्त करता येईल. मात्र इतर प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्या लेखापाल आणि कृषी विभागाच्या कार्यालय जाऊन दुरुस्त कराव्यात.

या योजनेअंतर्गत 14.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा केंद्र सरकारचे लक्ष आहे. ही योजना चालू होऊन जवळजवळ 2 वर्षे झाली. मात्र 11.45 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत आहेत.

हेही वाचा :पीएम किसान एफपीओ योजनेमुळे शेतकऱ्यांना होईल अनेक फायदे

किसान सन्मान योजनेचा पोर्टलवर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी हेदेखील या योजनेपासून वंचित ठेवण्याचे महत्त्वाचे कारण आहे. देशाच्या वार्षिक बजेट मध्ये या योजनेच्या वाट्याचे 75 हजार कोटी रुपये आहे.

English Summary: Millions of farmers apply and deprived of PM Kisan Sanman Yojana, now what?
Published on: 06 January 2021, 11:26 IST