बहुसंख्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणूनपशुपालन व्यवसाय करतात.या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दूध व्यवसायाला एक शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते.परंतुदुग्ध व्यवसाय देखीलसद्यस्थितीत तोट्याचा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाईच्या दूध खरेदी दरामध्येवाढ केली आहे. त्या माध्यमातून गाईचे दूध आता सरसकट 33 रुपये करण्यात आले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासामिळू शकणार आहे.परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही दुधाचे जुनेच दर देण्यात येत असल्यानेएक प्रकारे ही दूध उत्पादक शेतकर्यांची लूटहोत असल्याचे समोर आले आहे.काही दुग्ध प्रकल्प जास्तीचा नफा मिळावा यासाठी दूध खरेदी दर आला सरसकट लिटरमागे सहा रुपयांचे कात्री लावत असूनही राज्याचा दुग्धव्यवसाय विभाग नुसता हातात हात घालून बसला आहे. याबाबतीत शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याबाबत आदेश जारी करावेत आणि जर शासन ही दुग्ध उत्पादकांची लुट थांबविणार नसेल तर पुन्हा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी दिला आहे.
नक्की वाचा:इस्राईलचे राजदूत थेट शेतात! पाहणी केली लागवड केलेल्या केशर आंब्याची आणि केले कौतुक
कारवाईच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी?
जे प्रक्रिया व्यावसायिक शेतकऱ्यांची लूट करत आहेत आशांवर कारवाईदेखील केली जाणार आहे.स्थानिक पातळीवर याचीताबडतोब अंमलबजावणी केली जाईल असा प्रकारचा निर्णय देखील या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे हातात येणार आहेत.दुध प्रक्रियेतून जे पदार्थ तयार होतात त्यांच्या देखील किमतीत वाढ झाल्याने त्याचा फायदा उत्पादकांना देखील होणार आहे.परंतु लूट सुरू असली तरी कारवाईच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
.शेतकऱ्यांना गाईच्या दुधाच्या वाढलेला खरेदी दर 11 मार्चपासून मिळतील त्यामुळे खरेदी दर प्रतिलिटर 33 रुपये मिळतील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा योग्य मोबदला मिळायला हवा त्यासाठी खरेदी दर प्रतिलिटर 30 रुपये पेक्षा कमी होणार नाही याची काळजी घेण्याचा निश्चय पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आला अशी माहिती संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.
नक्की वाचा:अहो घरातल्या गव्हाला कीड लागतेय! हे उपाय करा आणि कीडमुक्त ठेवा गव्हाला
आता लगेच दरवाढ करणे शक्य नाही
दूध व्यवसायाचा खर्च वाढल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून दूध धंदा हा तोट्यात चालत होता.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चोहोबाजूंनी घेरले गेले होते अशा परिस्थितीत दूध प्रकल्पांच्या झालेल्या बैठकीमध्ये दुधाला सरसकट 33 रुपये खरेदी दर देण्याचा निर्णय निश्चित झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता केलेली दरवाढ ही उत्तम असून या पेक्षा दरवाढ आणखी लगेच होण्याची शक्यता नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून यापेक्षा कोणीही कमी दराने दूध खरेदी करू नये अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे.(संदर्भ- प्रभात )
Published on: 21 March 2022, 08:54 IST