संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जाते, पशुपालन हे विशेषता दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. दुधाळू पशूंना पशुपालक शेतकरी चांगले पशु आहार देतात त्यामुळे दुधारू पशु अधिक दुग्धोत्पादन देण्यात सक्षम होतात. दुधारू पशुना हिरवा चारा, कळना, पेंड अर्थात ढेप इत्यादी पशुखाद्य दिले जाते. पशूच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी शेतकरी बांधव चांगला पशुआहार देत असतात, मात्र एका तूर्किश पशुपालकाने एका जुगाडाचा आधार घेत दुग्ध उत्पादन वाढण्याचा दावा केला आहे. या तुर्कीश पशुपालकांच्या मते, दुधाळू जनावरांना शास्त्रीय संगीत ऐकवल्यास त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होते.
या पशुपालकाने हा प्रयोग केला आणि त्यातून त्याच्या दुधारू पशु च्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ देखील झाली असल्याचा दावा केला आहे. हा प्रयोग काल्पनिक वाटत असला तरी या पशुपालकाने यापासून दुग्ध उत्पादन क्षमता वाढत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या पशुपालकांचा हा जुगाड एक चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत प्रोटीन युक्त पशु आहार पशूला खायला दिल्यास पशूच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ होते एवढ ऐकलं होत, मात्र दुधाळू पशूंना हेडफोन लावून शास्त्रीय संगीत ऐकवल्यास दुग्ध उत्पादन क्षमता वाढते हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलं आणि कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल.
कोण आहे हा अवलिया जुगाडू पशुपालक
जगात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. तुर्कीमध्ये देखील पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. तुर्की येथील एक पशुपालक सध्या मोठ्या चर्चेत आला आहे, कारण की या पशुपालकाने दुधारू पशूंना शास्त्रीय संगीत ऐकवल्यास दुग्धोत्पादन क्षमता वाढत असल्याचा दावा केला आहे. या अवलिया जुगाडू पशुपालकाचे नाव आहे इज्जत कोकॅक. इज्जत यांच्याजवळ सुमारे 100 गाई आहेत. इज्जत यांच्या मते, आतापर्यंत त्यांची एक गाय दिवसाला सरासरी 22 लिटर दूध देण्यास सक्षम आहे.
जेव्हापासून इज्जत यांनी गाईंना शास्त्रीय संगीत ऐकवलं आहे तेव्हापासून त्यांच्या गाई दररोज साधारणता 27 लिटरपर्यंत दूध देत आहेत. म्हणजे एका गायीच्या एका दिवसाच्या दूध उत्पादन क्षमतेत पाच लिटरने वाढ झाली आहे.
शास्त्रीय संगीत ऐकून या पद्धतीने दुधात वाढ होते
इज्जत यांच्या मते, शास्त्रीय संगीत हे भावनापूर्ण असते त्यामुळे हे दुधारू पशु साठी उत्तम आहे. शास्त्रीय संगीत जनावरांना प्रसन्न बनवित असते आणि जेव्हा दुधारू पशु प्रसन्न असतात तेव्हा ते अधिक दूध देतात. एवढेच नाही तर जेव्हा दुधारू पशु प्रसन्न असतात तेव्हा दुधाचा दर्जा देखील सुधारतो. इज्जत यांनी पुढे सांगितले की, माझ्या सर्व गाई शास्त्रीय संगीत ऐकताहेत.
शास्त्रीय संगीत मनाला शांत करत असते अगदी त्याच प्रमाणे गायीला देखील शास्त्रीय संगीत शांत करते. यामुळे गाई शांत राहतात आणि प्रसन्न होतात त्यामुळे गाईंच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होते. इज्जत यांनी हे काल्पनिक वाटत असल्याची कबुली दिली मात्र त्यांनी यापासून त्यांना लाभ मिळाला असल्याचा दावा केला.
Published on: 12 February 2022, 11:48 IST