News

सध्या दुधाचे दर चांगलेच वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. याउलट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र याचा तोटा सहन करावा लागत आहे. आता येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे.

Updated on 19 October, 2022 3:09 PM IST

सध्या दुधाचे दर चांगलेच वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. याउलट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र याचा तोटा सहन करावा लागत आहे. आता येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे.

सध्या निव्वळ दूध विक्रीला प्राधान्य देणाऱ्या संघांना दूध खरेदीच्या स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी दूध संघांनी त्याच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात किमान 5 रुपयांची दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दूधाच्या एकूण उत्पादनात 7 ते 10 % घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांना दूध महागणार (milk price hike) आहे. सध्या दुधाचा फ्लश सिझन आलाच नसल्याने दरवर्षी अतिरिक्त दुधातून लीन सिझन (Lean season from milk) साठी वापरण्यात येणाऱ्या दूध पावडरची निर्मिती थांबली आहे.

बंगालच्या उपसागरात धडकणार चक्री वादळ, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती

सध्या दुधाळ जनावरात झालेला लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने दूध उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पुरवठ्यावर परिणाम होत आहे. जनावरांच्या मुक्त चरण्यावर बंधन आल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. लसीकरणामुळे झालेल्या आरोग्यातील बदलामुळे देखील दूध उत्पादन घटले आहे. अशाप्रकारची अनेक करणे आहेत.

कृषी विकास परिषद 2022: सेंच्युरियन वर्ल्ड स्कूल येथे कृषी विकास परिषद

याचा परिणाम भारताकडून दुधाच्या दरवर्षी होणाऱ्या 1.18 लाख मेट्रिक टन निर्यातीवर होणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनावर याचा परिणाम होणार आहे. तसेच इतर दूध उत्पादक देशात देखील दुधाची कमतरता आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
पुण्यात पावसाने मोडला 140 वर्षांचा विक्रम, पावसाने उडाली दाणादाण..
राज्यातील दोन खासदारांचे तडकाफडकी राजीनामे, रेल्वेच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने निर्णय
उद्घाटनासाठी गेले आणि लिलावच पुकारला, शेतकऱ्यांसमोर छगन भुजबळ यांचा वेगळा अंदाज

English Summary: Milk prices will increase further, milk production will decrease
Published on: 19 October 2022, 03:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)