सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा नाहीच. आता दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने गुजरातच्या जनतेला मोठा धक्का दिला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
अमूल ताझा, शक्ती, टी स्पेशल, गायीचे दूध, स्लिम अँड स्ट्रीम, गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रँडच्या किंमतीत आता 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. अमूलने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.
वृत्तानुसार, नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. आता नवीन किंमतींनुसार, अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जी आता 34 रुपये प्रति 500 मिली दराने विकली जाईल.
विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने नोटांची उधळण करत केला राडा..
अमूलने दुधाचे दर का वाढवले?
उत्पादन आणि खर्चात वाढ झाल्याने अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मजुरीत किंमतीत 8-9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दर महिन्याला वाढत आहेत दुधाचे भाव :
गेल्या वेळी अमूल कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती आणि आज 3 फेब्रुवारीला दुधाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. अशा स्थितीत ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत दुधाच्या दरात दर महिन्याला सरासरी 1 रुपयांनी वाढ झाली आहे.
अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता वाढली, आजही राज्यात पावसाचा अंदाज
Published on: 31 March 2023, 10:42 IST