News

मंगळवारी (५ मार्च २०२४) मध्य आणि पश्चिम भारत विभागाची 'MFOI किसान भारत यात्रा' झाशी येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. जी मध्य आणि पश्चिम भारतातील ग्रामीण भागात भेट देईल आणि शेतकऱ्यांना MFOI उपक्रमाविषयी शिक्षित करेल. तसंच जनजागृतीचे काम करेल. यासाठी झाशी येथील राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना जागरुक करण्यासोबतच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मिलियनेअर शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Updated on 05 March, 2024 8:04 PM IST

MFOI Kisan Bharat Yatra Update : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा नेहमीच महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पण शेतकऱ्यांना जो मान सन्मान मिळायला हवा तो मिळताना दिसत नाही. शेतकऱ्यांना ही ओळख देण्यासाठी देशातील अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' (MFOI) पुरस्काराचा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत कृषी क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना MFOI उपक्रमाची जाणीव करून देण्यासाठी कृषी जागरणने 'MFOI किसान भारत यात्रा' देखील सुरू केली आहे. जी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराबाबत जागरूक करेल आणि त्यांना या पुरस्कारापर्यंत पोहोचवेल.

मंगळवारी (५ मार्च २०२४) मध्य आणि पश्चिम भारत विभागाची 'MFOI किसान भारत यात्रा' झाशी येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. जी मध्य आणि पश्चिम भारतातील ग्रामीण भागात भेट देईल आणि शेतकऱ्यांना MFOI उपक्रमाविषयी शिक्षित करेल. तसंच जनजागृतीचे काम करेल. यासाठी झाशी येथील राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना जागरुक करण्यासोबतच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मिलियनेअर शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. अशोक कुमार सिंग, कुलगुरू, RLBCAU प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी यावेळी शेतीत सतत होत असलेला विकास आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले. या व्यतिरिक्त कार्यक्रमात ममता जैन - ग्रुप एडिटर आणि सीएमओ, कृषी जागरण, अश्वनी सिंग - महिंद्रा ट्रॅक्टर्स, अमित सिंग - महिंद्रा ट्रॅक्टर्स, अनिल कुमार वर्मा - जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड, डॉ. अनिल कुमार - संचालक शिक्षण, RLBCAU झांसी, डॉ. डॉ. एसएस सिंह - संचालक विस्तार शिक्षण, RLBCAU, झांसी, डॉ. GP सिंह - संचालक NBPGR, शायनी डॉमिनिक - व्यवस्थापकीय संचालक, कृषी जागरण यासह कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या, अनेक कृषी तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी यावेळी उपस्थित होते.

'शेतकऱ्यांना मिळणार ओळख'

कार्यक्रमाची सुरुवात कृषी जागरणच्या व्यवस्थापकीय संचालिका शायनी डॉमिनिक यांनी सर्वांचे स्वागत करून केली. यानंतर कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, मला आनंद आहे की आज मी देशाचे पोट भरणाऱ्यांमध्ये आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि मी लहान असताना माझ्या गावातील सर्वात श्रीमंत शेतकरी होण्याचे माझे स्वप्न होते. पण तशी संधी मला कधीच मिळाली नाही. तसेच देशात असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांचे हे स्वप्न आहे, असेही ते म्हणाले. पण, त्यांना ना संधी दिली जाते ना त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले जाते. शेतकऱ्यांनाही जे प्रोत्साहन मिळायला हवे होते. हे लक्षात घेऊन आम्ही MFOI सुरू केले आहे. त्याअंतर्गत कृषी विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

'देशातील आणि जगभरातील शेतकरी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार'

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा विचार केला तर अंबानी आणि अदानी यांची नावे समोर येतात. मात्र, शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. परंतु MFOI चा हा उपक्रम देशातील अशा शेतकऱ्यांना शोधण्याचा आहे जे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत. गेल्या वर्षी MFOI च्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु यावर्षी केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील श्रीमंत शेतकऱ्यांना भारतात आणणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जिथे ते भारतातील शेतकऱ्यांशी त्यांचे विचार मांडू शकतात. MFOI 2024 साठी नोंदणी सुरू झाली आहे आणि आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून अर्ज प्राप्त होत आहेत.

'शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे'

कार्यक्रमाला संबोधित करताना प्रमुख पाहुणे डॉ. अशोक कुमार सिंग, कुलगुरू, RLBCAU म्हणाले की, विद्यापीठाची सर्वात मोठी आणि पहिली जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची पाळी येते. आज आमच्या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी उद्या कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काम करतील. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. पण, विकास तेव्हाच होतो जेव्हा शेतकरी स्वत: पुढे येतो आणि काहीतरी करू इच्छितो. शेती म्हणजे केवळ शेती नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्याकडे व्यवसाय म्हणूनही बघायला हवे. तरच आपण त्यातून चांगला नफा मिळवू शकू.

यासोबतच त्यांनी शेतीतील पाण्याच्या कमतरतेवरही आपले मत मांडले. देशात आधीच पाणी टंचाईमुळे शेती प्रभावित होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर आधारित शेती करण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांशी जोडून त्यांच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी MFOI या कृषी जागरणने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

MFOI किसान भारत यात्रा म्हणजे काय?

'MFOI किसान भारत यात्रा 2023-24' मध्ये ग्रामीण परिस्थिती बदलणाऱ्या स्मार्ट गावांची कल्पना आहे. MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत देशभरातील 1 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना जोडण्याचे आहे.

English Summary: MFOI Kisan Bharat Yatra MFOI Kisan Bharat Yatra begins in Jhansi krishi jagran mfoi 2024
Published on: 05 March 2024, 08:04 IST