MFOI २०२४: 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड' २०२४ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम देशातील अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने शेतकऱ्यांना ओळखण्याच्या आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरू केला आहे. MFOI 2023 (Mahindra Millionaire Farmer of India Award 2023)च्या भव्य कार्यक्रमानंतर आता MFOI 2024 ची तयारी सुरू झाली आहे. २०२४ मध्ये १ ते ५ डिसेंबर दरम्यान MFOI २०२४ चे आयोजन केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अवॉर्ड शोमध्ये देशभरातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
MFOI २०२३ चे देशभरातून कौतुक
कृषी जागरणच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. MFOI बद्दल देशातच नाही तर परदेशातही खूप चर्चा आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे, ज्याला पुरस्कार शोचे स्वरूप देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान (MFOI २०२३) या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. जेव्हा हजारो शेतकरी MFOI पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. तसंच शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एवढा भव्य अवॉर्ड शो आयोजित करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. अवॉर्ड शोसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी कृषी जागरणचा हा उपक्रम भविष्यातही सुरू राहणार आहे.
MFOI २०२४ साठी नोंदणी सुरू
शेतकऱ्यांच्या माहितीसाठी MFOI २०२४ साठी नोंदणी देखील सुरू झाली आहे. MFOI च्या या उपक्रमांतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातील अशा शेतकर्यांचा गौरव करण्यात येणार आहे जे वार्षिक १० लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत आणि शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यांच्या आजूबाजूच्या शेतकर्यांसाठी उदाहरणही बनत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही जर एक शेतकरी, शेतीमध्ये नावीन्य आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना शेतीसाठी प्रेरित करणारे असाल तर तुम्हीही आताच कृषी जागरण द्वारे आयोजित आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सद्वारे प्रायोजित असणाऱ्या 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड' २०२४ साठी नोंदणी करु शकता.
MFOI २०२४ साठी नोंदणी कशी करावी
१) नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया https://millionairefarmer.in या वेबसाइटवर जावे लागेल.
२) वेबसाइटच्या शीर्षस्थानी अनेक भाषा पर्याय उपलब्ध असतील, सर्वप्रथम तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल. तसंच तुम्ही तुमची संबंधित भाषा निवडून वेबसाइटच्या आवृत्तीवर जा.
३) यानंतर पेजवर दिलेल्या एनरोलमेंट पर्यायावर क्लिक करा आणि तुमची भाषा निवडा.
४) आता MFOI नावनोंदणी फॉर्म उघडताच, तुम्हाला त्यात तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला खालील नेक्स्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
५) यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि इतर महत्त्वाची माहिती नावनोंदणी फॉर्ममध्ये टाकावी लागेल.
६) त्यानंतर तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न आणि एकरच्या संदर्भात तुमच्याकडे असलेल्या लागवडी योग्य जमिनीची माहिती द्यावी लागेल.
७) यानंतर तुम्हाला तुमची श्रेणी निवडावी लागेल, म्हणजे तुम्ही कोणते पीक घ्याल. ते निवडून जोडावे लागेल. यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त श्रेणी देखील निवडू शकता.
८) श्रेणी निवडल्यानंतर, तुम्हाला खालील नेक्स्ट बटणावर क्लिक करावे लागेल आणि तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार नेमका काय आहे?
देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात काही मोठे व्यक्तिमत्व आहे. त्याची एक खास ओळख आहे. पण शेतकऱ्याचा विचार केला तर काहींना एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे शेतात बसलेल्या गरीब आणि असहाय्य शेतकऱ्याचा. पण खरी परिस्थिती तशी नाही. हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी जागरणने 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड शो हा उपक्रम सुरू केला आहे. ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना एक-दोन जिल्हा किंवा राज्य पातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख मिळणार आहे. कृषी जागरणच्या या उपक्रमाने देशभरातून काही आघाडीच्या शेतकऱ्यांची निवड करून केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम केले आहे.
Published on: 29 December 2023, 12:29 IST