News

देशभरात रोज नव्याने पुरस्कार सोहळा होताना दिसतो. यात उद्योगपती, सेलिब्रेटी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते-नेते अशा विविध लोकांचा समावेश असतो. पण आजपर्यंत कधी शेतकऱ्यांचा सन्मान झालेला आपण पाहिला नसेल. परंतु आता कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि मातीशी एकनिष्ठ असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आता दिल्लीत होणार आहे.

Updated on 06 December, 2023 3:23 PM IST

देशभरात रोज नव्याने पुरस्कार सोहळा होताना दिसतो. यात उद्योगपती, सेलिब्रेटी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते-नेते अशा विविध लोकांचा समावेश असतो. पण आजपर्यंत कधी शेतकऱ्यांचा सन्मान झालेला आपण पाहिला नसेल. परंतु आता कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि मातीशी एकनिष्ठ असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आता दिल्लीत होणार आहे. कृषी जागरणने आयोजित केलेल्या 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया २०२३' प्रायोजक बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्यापासून (दि.६) पासून ८ डिसेंबर रोजी दिल्लीतील पुसा मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच 'MFOI' ने सुरू केलेल्या किसान भारत यात्रेला देखील गडकरींच्या हस्ते हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार:
या कार्यक्रमासाठी आचार्य देवव्रत-गुजरातचे राज्यपाल, नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, परषोत्तम रूपाला- मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास मंत्री, पी.सथसिवम - भारताचे सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, प्रताप सारंगी- लोकसभा सदस्य ओडीशा, महेंद्रसिंग सोळंकी - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती, पोचा ब्रम्हानंदा - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती - आंध्रप्रदेश, शंकर लालवानी - लोकसभा सदस्य -इंदोर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्रातून मार्गदर्शन :
या कार्यक्रमासाठी देशभरातील शेतकरी उपस्थित असणार आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना शेतीबाबतचे उत्तम मार्गदर्शन मिळावे यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला गती देण्यासाठी उद्योग समूहांची भूमिका, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी कृषी मंडळांचे सहकार्य, सहकारी संस्था आणि एफपीओ: शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची स्थिरता आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी आधारस्तंभ, महिला शेतकरी/महिला उद्योजकांचा कृषी आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी त्यांचे योगदान साजरा करणे, राज्यस्तरीय कृषी वाढ आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये कुलगुरूंची भूमिका, विश्वासार्ह कृषी माध्यम-तथ्य-तपासणी आणि एफटीजे (शेतकरी फार्मर जर्नालिस्ट) यांची भूमिका, केव्हीके आणि एटीएआरआय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधारस्तंभ, जागतिक बाजारपेठ: कृषी उत्पन्न वाढीसाठी निर्यातीचा लाभ घेणे, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवणे अशा विविध विषयांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मिलियनेअर शेतकरी पुरस्कार सोहळ्यातील श्रेणी :
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी
भारतातील मिलियनेअर फळ उत्पादक शेतकरी
भारतातील मिलियनेअर वृक्षारोपन करणारे शेतकरी
भारतातील मिलियनेअर मसाला उत्पादक शेतकरी
भारतातील मिलियनेअर डेअरी उत्पादक शेतकरी
भारतातील मिलियनेअर कुक्कुटपालन करणारे शेतकरी
भारतातील मिलियनेअर आदिवासी शेतकरी
भारतातील मिलियनेअर कडधान्य उत्पादक शेतकरी शेतकरी
भारतातील मिलियनेअर महिला शेतकरी
भारतातील मिलियनेअर वेटीवर शेतकरी
भारतातील मिलियनेअर पीक उत्पादक शेतकरी
भारतातील मिलियनेअर सेंद्रिय उत्पादक शेतकरी
भारतातील मिलियनेअर मत्स्यपालक शेतकरी
भारतातील सहकारी शेतकरी
भारताील एफपीओ ऑफ द इयर शेतकरी

केव्हीके (KVK) किती सहभागी असणार?
या कार्यक्रमासाठी देशभरातील ७५० कृषी विज्ञान केंद्र (KVK) सहभागी असणार आहेत. त्याचबरोबर केव्हीके अंतर्गत येणारे शेतकऱ्यांची संख्या ७५० पेक्षा जास्त असणार आहे. तसंच थेट शेतकऱ्यांची संवाद साधल्यामुळे अर्थातच नॉन केव्हीके अंतर्गत येणारे शेतकरी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत.

पुरस्कार कसे असणार -
शेतकरी - ७८७
बिलिनीयर - ५० पेक्षा जास्त
मिलिनीयर - ६०० पेक्षा जास्त
राज्य - ६० पेक्षा जास्त

"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल."
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
English Summary: MFOI Award 2023 Farmers Honor Ceremony to be held in Delhi; Union Minister Gadkari will inaugurate
Published on: 05 December 2023, 04:11 IST