बियाणे पाकिटावर येणार बनवण्याची पद्धत

31 October 2020 12:52 PM


संकरित कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांना  विकताना ते कोणत्या पद्धतीने तयार झाले हे पाकिटावर नमूद करण्याचा आदेश राज्याचा कृषी विभागाने  कापूस बियाणे  उद्योगाला दिला आहे. दुसऱ्या बाजूला बियाणे कंपन्यांनी या सक्तीला तीव्र विरोध दर्शविला आहे.  बियाणे कशा पद्धतीने  तयार झाले याची माहिती  सध्या  पाकिटावर दिली जात नाही. कपाशीच्या  बियाणे  संकर पद्धतीत मजुरांकडून पुंकेसर काढावे लागतात. मजुराकरावी होणाऱ्या या बियाणे उत्पादन पद्धतीत खर्च जादा होतो. दुसऱ्या पद्धतीत खर्च कमी होतो. ही पद्धत लक्षात येण्यासाठी पाकिटावर थेट पद्धत नमूद करावी, असा आग्रब कृषी विभागाने कंपन्यांना धरला आहे.

कपाशी बियाणे उत्पादन पॅकिंग आणि विक्री विविध  कंपन्यांकडून देशभर होते. केंद्र शासनाकडे मध्यवर्ती बियाणे समिती आहे. राज्य शासनाने या समितीची किंवा केंद्राची  मान्यता  न घेताच परस्पर आपले नियम लावण्याची सूर केलेली पद्धत चुकीची आहे, असे एका कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.  बियाण्याच्या लेबलवर काय असावे हे केंद्र शासनाने अगोदरच कायाद्यान्वे सांगितले आहे. 

त्याशिवाय काही इतर नमूग करण्याचा आग्रह राज्य शासनाकडून होत असल्यास तो केंद्राच्या नियमावलीचा भंग ठरेल. बियाणे समितीच्या सल्ल्यानंतर केंद्रदेखील कोणती दुरुस्त करत असते. त्यामुळे राज्याने परस्पर नियम लावणे अयोग्य आहे, असा युक्तीवाद बियाणे उद्योगांकडून केला जात आहे.

seed packet संकरित कपाशीचे बियाणे Hybrid cotton seeds
English Summary: Method of formation on seed packet

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.