News

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे.राज्यातील कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सुरू आहे. परंतु आता पुन्हा एकदा येत्या 24 तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Updated on 01 December, 2021 10:40 AM IST

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे.राज्यातील कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सुरू आहे. परंतु आता पुन्हा एकदा येत्या 24 तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

लक्षदीप मालदीव जवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने द्रोनीय भागामुळे आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यासोबतच मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 आज मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर,नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक,अहमदनगर,धुळे, नंदुरबार,जळगाव, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 मागील दोन-तीन दिवसांपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदेव व लक्षद्वीप व  चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व व मध्य अरबी समुद्रात द्रोनीयस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव  व लक्षदीप मध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्याच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे.

English Summary: meterological guess next three days possibility in maharashtra
Published on: 01 December 2021, 10:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)