News

यावर्षी मान्सूनने अगदी दाणादाण उडवली. जर मान्सूनच्या पावसाचा विचार केला तर एक जून ते 22 सप्टेंबर हा कालावधी पावसाचा समजला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून हे वेळापत्रक पूर्णतः बदललेले पाहायला मिळत आहे.एक जूनला पावसाला सुरुवात होऊन सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.

Updated on 01 October, 2021 9:41 AM IST

 यावर्षी मान्सूनने अगदी दाणादाण उडवली. जर मान्सूनच्या पावसाचा विचार केला तर एक जून ते 22 सप्टेंबर हा कालावधी पावसाचा समजला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून हे  वेळापत्रक पूर्णतः बदललेले पाहायला मिळत आहे.एक जूनलापावसाला सुरुवात होऊन सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.

 आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल भारतीय हवामान विभागाचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागातून येत्या 6 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. परतीच्या पावसाविषयी चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाण अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये देशाच्या मध्यभागातील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहुन जास्त राहील. तसे वायव्य भागात चे प्रमाण सर्वसाधारण राहील. यानंतर देशातील वायव्य प्रदेशातील पावसाचे प्रमाण कमी होत जाईल.

 

 तिसऱ्या आठवड्यामध्ये देशाच्या पूर्व भागात पाऊस सुरू राहण्याची  शक्यता आहे आणि चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस सर्वसाधारण प्रमाणावर कमी झालेला असेल. यावर्षी माहितीनुसार विचार केला तर जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिले. सप्टेंबरमध्ये विक्रमी सर्वाधिक म्हणजे एकशे पस्तीस टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे.

English Summary: meterological department give information about return mansoon
Published on: 01 October 2021, 09:41 IST