जूनचा पहिला आठवडा उजडला तरी सुद्धा राज्यात सर्वत्र रखरखत ऊनच आहे. पावसाच्या(rain) पाऊलखुणा तरी कुठंच दिसत नाही. यंदा हवामान खात्याने सर्वकाही पोषक वातावरण असल्याने यंदा राज्यात वेळेत आणि भरघोस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु असे काहीच घडले नाही. उलट पाऊस लांबणीवर गेला आहे. योग्य वेळेत पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्गाने खरिपाची सर्व तयारी केली होती परंतु पाऊसाने धोका दिल्यापासून शेतकरी(farmer) वर्ग चिंतेत आहे.
महाराष्ट्र राज्यात सुद्धा वेळेआधी पाऊसाचे आगमन:
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस पडेल असा व्यक्त केला होता परंतु ऐन वेळी वाऱ्याची दिशा बदल्याने मान्सून पावसाने सर्वानाच हुलकावणी दिली आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा च्या वर्षी 1 जून नाही तर 29 मे रोजी पाऊस केरळात दाखल झाला होता त्यामुळे यंदा महाराष्ट्र राज्यात सुद्धा वेळेआधी पाऊसाचे आगमन होईल असा अंदाज होता. या उलट राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भयानक गर्मी वाढत आहे परंतु येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा:येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन,हवामान विभागाचा अंदाज
पाऊसाच्या लांबणीमुळे चिंतेचे वातावरण:-
यंदा च्या वर्षी वेळेत आणि मुबलक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने केला होता परंतु यंदाच्या वर्षी पावसाने हुलकावणी दिली आहे. सर्व शेतकरी वर्गाने खरिपाची तयारी केली होती परंतु पावसाअभावी सर्वकाही ठप्प पडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
हेही वाचा:मोदी सरकार 'जन समर्थ' हे कॉमन पोर्टल सुरू करणार,अनेक सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध
येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस:-
राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने आपली तुरळक हजेरी लावली आहे. काही भागात तर अजून ऊष्णता च आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खरिपाच्या पेरण्यामुळे चिंतीत आहे. येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग थोडासा चिंतेतून बाहेर आला आहे.
Published on: 06 June 2022, 12:09 IST