मागील काही दिवसांपासून अचानकपणे म्हणजे अनियमितपणे पाऊस आपली हजेरी लावत आहे त्यामुळे वातावरणात सतत यामुळे बदल होत निघाला आहे. कालच्या रविवार पर्यंत सर्वत्र पावसाळी वातावरण झाले होते पण सोमवार पासून शहरात वातावरणात कोरडेपणा निर्माण झालेला आहे. शुक्रवारी शहरात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊसाच्या हलक्या सरींची हजेरी लागणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामानाने वर्तवलेली आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पाऊसामुळे आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी लागणार असल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणेकर घेतायत दोन्ही ऋतूंचा लाभ :-
फक्त एवढेच नाही तर शनिवार पासून पुन्हा एकदा वातावरणात कोरडेपणा येणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. कालच्या मंगळवारी शहरामध्ये किमान १२.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर कमाल ३४ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये मंगळवारी सायंकाळी कमाल ३५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर किमान १२.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. पुण्यात असे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे पुणेकरांना हिवाळा तसेच उन्हाळा हे दोन्ही ऋतू अनुभवायला भेटत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात झाली दोन ते तीन अंश तापमानात वाढ :-
पुण्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे असे पुण्यातील वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक शहरांमध्ये तापमानात कमाल तापमानाची वाढ झालेली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ज्या प्रकारे तापमान असते त्या तापमानापेक्षा यंदा दोन ते तीन अंश ने वाढ झालेली आहे. गुरुवारी तापमानात ३५ अंश पेक्षा वाढ झालेली होती तर मंगळवारी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.
पुढील काही दिवस थंडी आणि गरमी अनुभवायला भेटनार :-
सध्या उन्हाळा ऋतू चालू होण्याच्या आधीच गरमीमध्ये वाढ झालेली आहे मात्र रात्री आणि पहाटे च्या वेळी थंडी जाणवत आहे. तसेच आज गुरुवारी तसेच उद्या शुक्रवारी पहाटे धुके पडणार आहे असा अंदाज पुण्यातील वेधशाळेने वर्तविला आहे. शहरातील तापमानात सतत वाढ होत असल्याने अजून पुढचे काही दिवस पुणेकरांना वातावरणात थंडी तसेच गरमी सुद्धा अनुभवायला भेटणार आहे.
Published on: 24 February 2022, 06:14 IST