गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र, कोकण या विविध भागांमध्ये हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने आपली हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत मोठी वाढ झालेली आहे. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात पिके असल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्ष्यात 2 ते 3 वेळा अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी बरसणार:-
गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्ये अवकाळी पावसाने तडाखा लावला आहे. या काळात सर्वात मोठे नुकसान हे फळबागायतदारांचे झालेले आहे. यामध्ये द्राक्षे आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काल मध्यरात्री पासून सोलापूर, पुणे, आणि चाकण या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच मराठवाड्यात सुद्धा पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांमध्ये राहणार ढगाळ वातावरण:-
गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गाला रोगराई ची भीती आहे. सध्या राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस:
गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. काल मराठवाड्यात सुद्धा ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट होत असल्याने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्याचा तासाला वेग हा 35 ते 40 किमी असणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दात शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: 12 March 2022, 06:01 IST