1. बातम्या

पाच महिन्याच्या मुक्कामानंतर मॉन्सून परतला : हवामान विभाग

KJ Staff
KJ Staff


यंदा पाच महिने ठाण मांडून बसलेला नैऋत्य मॉन्सूनने अखेर देशातून परतल्याचे बुधवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले. ईशान्य मॉन्सूनचे आगमन झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. यावर्षी आपण पाहिले त्या पद्धतीने जून ते सप्टेंबर या कालावधीत राहणारा नैऋत्य मान्सून यावर्षी एक महिना जास्त म्हणजे ऑक्टोबरपर्यंत देशात मुक्काम राहिला.भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी मॉन्सूनच्या आगमन होण्याचे आणि परतीच्या प्रवासाचे नव्या तारखा जाहीर केल्या होत्या म्हणजे कॅलेंडर तयार केले होते. परंतु या सगळ्या तारखांना मॉन्सून यावर्षी फाटा दिला. नव्या कॅलेंडरनुसार १५ ऑक्टोबरच्या पर्यंत मॉन्सून भारतातून परतणे अपेक्षित होते.परंतु प्रत्यक्षात त्याचा मुक्काम हा २८ ऑक्टोबरपर्यंत राहिला.

भारतीय हवामान विभागानुसार भारताच्या दक्षिण भागात ईशान्य मान्सूनचे आगमन झाले आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू, पुदुचेरी, आंध्रप्रदेशच्या काही किनारी भागांसह भारताच्या ईशान्य भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.यावर्षी महाराष्ट्रातील नगर, मुंबई, पुणे, अकोला, अमरावती इत्यादी ठिकाणाहून मॉन्सून ८ ऑक्टोबरला परतणे अपेक्षित होते.याठिकाणी मॉन्सून एक तब्बल वीस दिवस जास्त मुक्काम ठोकला. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भाग म्हणजेच जसे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि फळबागा उध्वस्त झाल्या. त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांना वाटप करून बघावा लागला.

दरम्यान यंदा मॉन्सून केरळमध्ये १ जूनला दाखल झाला होता. त्यानंतर ११ जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाला त्यानंतर १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. साधरणपणे राजस्थानमध्ये तीन महिने दोन दिवस मुक्काम केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मॉन्सून परतीवर निघाला. हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही परतीच्या मॉन्सूनची तारीख जाहीर केली होती. मात्र तब्बल अकरा दिवस उशिराने मॉन्सूनने पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला होता. त्यानंतर सहा ऑक्टोबरपर्यंत बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले होते. परंतु ९ ऑक्टोबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीचा प्रवास जवळपास पंधरा दिवस रेंगाळला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मॉन्सूनने माघार घेतली होती. तर २६ ऑक्टोबर रोजी निम्म्या महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून परतीचा मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters