कोल्डवेव्ह उत्तर भारतामध्ये वाढत असल्याने याचा परिणाम हरियाणा, राजस्थान तसेच संपूर्ण भारतामध्ये दिसून येत आहे . डोंगराळ भागात ताजी बर्फवृष्टी झाल्याने मंगळवारी उत्तर भारतात शीतलहरीची परिस्थिती तीव्र झाली.याचा परिणाम बऱ्याच भागात झाला आहे . हिमाचल प्रदेशात शीतलहरीची परिस्थिती तीव्र झाल्याने किमान तापमानात एक ते दोन टक्क्यांनी घट झाल्याचे आयएमडीने सांगितले.केयलॉंग, कल्प, डलहौसी आणि कुफरी हे शून्य तापमानाच्या खाली गेले आहे .
महाराष्ट्राच्या इतर भागातही किमान तापमानात घट झाली. नाशिकमध्ये 11.8 डिग्री सेल्सियस, पुणे येथे 13 डिग्री सेल्सियस व ठाणे येथे 17 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.भारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अस्थिरतेमुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी बऱ्यापैकी झाली आहे असे सांगितले .
शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत थंड वाढली आहे . नवीन वर्षाच्या संध्याकाळपर्यंत पारा आणखी खाली येण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली.कमीतकमी 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान तीव्र शीतलहरी असते.काश्मिरमधील बर्याच ठिकाणी मध्यम प्रमाणात हिमवृष्टी झाली आणि पर्यटन आणि व्यापाराशी संबंधित असणाऱ्यांनी याचा आनंद लुटला आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळपासूनच व्यवसाय वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रीनगर येथे सकाळी सातच्या सुमारास हिमवृष्टी सुरू झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले .
Published on: 30 December 2020, 11:41 IST