News

यवतमाळ: यंदाच्या खरीप हंगामात कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कापसाला सोन्याचा भाव मिळण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तरी सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसत आहे. कापसाची कमी लागवड आणि मुसळधार पावसामुळे उध्वस्त झालेली पिके यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो.

Updated on 07 September, 2022 12:41 PM IST

यवतमाळ: यंदाच्या खरीप हंगामात (Kharif season) कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कापसाला (Cotton) सोन्याचा भाव मिळण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton farmers) यंदा तरी सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसत आहे. कापसाची कमी लागवड आणि मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) उध्वस्त झालेली पिके यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो.

कापसाचे कमी उत्पादन लक्षात घेता कापूस खरेदी करणारे व्यापारी (Merchants buying cotton) आता थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचत आहेत. कमी दरात कापूस शेतकऱ्यांकडून मिळवा यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरु असल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली. यादिवशी ११ हजार ते १६ हजार रुपये क्विंटल पर्यंतचे दर विविध बाजारपेठेत राहिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस बाजारामध्ये येण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. तसेच या भागामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कपाशीचे पीक उध्वस्त झाले आहे.

Rain Alrt: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार! यलो अलर्ट जारी

विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस मोठ्या प्रमाणावर पावसामुळे खराब झाला आहे. अतिवृष्टीमुले कापसाची पिके सोडून गेली आहेत. या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. पावसामुळे कपाशीच्या पिकाची वाढ खुंटली आहे.

यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात हे क्षेत्र जवळपास तीन लाख हेक्टरच्या घरात आहे. इतर कापूस क्षेत्राला अती पावसाने फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. नंतरच्या काळात उन्हाचा तडाखा अधिक राहिला. यातून कापसाची पातीगळ मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे कापसाचे एकरी उत्पादनही घटणार, अशी स्थिती सर्वत्र आहे.

Gold Price: सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30,000 रुपयांना...

यंदा अमेरिका आणि चीनमध्येही कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये पाण्याविना कापसाची पिके जाळून चालली आहेत. अमेरिकेमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंध प्रांतात आलेल्या पुराने कापसाचे अर्धेअधिक क्षेत्र क्षतिग्रस्त झाले आहे. त्यामुळे व्यापारी आतापासूनच कापूस खरेदी करण्यावर जोर देत आहेत.

व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. १० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टाेकन शेतकऱ्यांना दिले जात आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळविण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे.

महत्वाच्या बातम्या:
7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 28 सप्टेंबरला मिळणार आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार?
पीएम किसान योजनेत केंद्राकडून मोठा बदल! या पाच कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे...

English Summary: Merchants at the farmer's door even before the cotton leaves
Published on: 07 September 2022, 12:41 IST