News

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कष्टकरी जनसंघाकडून एसटी बंदचे आंदोलन करण्यात येणार होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक झाली. बैठकीनंतर एसटी बंदच्या संप मागे घेण्यात आला असून एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनीपत्रकार परिषदेत दिली.

Updated on 06 November, 2023 2:52 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कष्टकरी जनसंघाकडून एसटी बंदचे आंदोलन करण्यात येणार होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक झाली. बैठकीनंतर एसटी बंदच्या संप मागे घेण्यात आला असून एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसटीच्या बैठकीत चर्चा झाल्याने एसटी बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांना मदत करणं ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे उदय सामंत म्हणालेत.

या बैठकीत काही महत्त्वाचे घेण्यात आले आहेत. आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बोनस वाढीसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. येत्या चार वर्षात एसटीत नऊ हजार बसेस दाखल होतील त्याचबरोबर येत्या दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनीपत्रकार परिषदेत दिली.

English Summary: Meet Minister Uday Samant with Gunaratna Sadavarten, know the decision
Published on: 06 November 2023, 02:52 IST