News

परभणी: वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषी यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्‍पभुधारक, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषी औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषी यांत्रिकीकरणामूळे पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता कृषी यंत्र उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

Updated on 01 March, 2019 8:16 AM IST


परभणी:
वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषी यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्‍पभुधारक, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषी औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषी यांत्रिकीकरणामूळे पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता कृषी यंत्र उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण दिनानिमीत्त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बैल व ट्रॅक्टरचलित सुधारित औजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, तालुका कृषी अधिकारी श्री. पी. बी. बनसावडे, परभणी आत्मा संचालक श्री. के. आर. सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या व विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समन्वयातून कृषी यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहिजे असे सांगितले तर शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण बळकट करून उन्नती साधावी असे मत आत्मा संचालक श्री. के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यापीठातील ऊर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारित कृषी औजारे, अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिकाचे उद्घाटनही कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. कृषी अवजारे प्रदर्शनात विविध मोठ्या प्रमाणात कंपन्यांची बैल व ट्रॅक्टरचलित सुधारित कृषी औजारे, सौर चलित औजारे इत्यादींचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. 

तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेतीरेशीम उद्योगपशुधन संगोपअपारंपारीक उर्जा स्त्रोत इत्यादी विषयावर डॉ. सी. बी. लटपटेडॉ. अे. के. गोरेडॉ. डी. एस. चव्हाण, डॉ. आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केलेसुत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानलेमेळाव्‍यास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्‍येनी सहभागी झाले होते. 

English Summary: mechanization is need to reduce the cost of cultivation
Published on: 01 March 2019, 07:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)