News

प्राचीन काळापासून लोकांना हवामानाचा अभ्यास होता.

Updated on 28 May, 2022 3:11 PM IST

सूर्य,चंद्राचे भ्रमंनमार्ग ,तारे ,ग्रह ह्यांचे वर्षभरातील मार्ग,पावसाचे नक्षत्र आणि अत्याधिक तापमानाचे दिवस इ ची इत्यंभूत माहिती प्राचीन खगोल अभ्यासकांना होती."नवतपा" हे त्यातील एक.सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो असे मानले जाते,परंतु त्यांनी ह्या ज्ञानाला ज्योतिषाशी जोडले आणि ग्रह ,ताऱ्याचा प्रभाव सांगायला सुरुवात केली.अवकाशातील वर्षे भराच्या मार्गावर २७ नक्षत्रे येतात.दर वर्षी त्या त्या वेळेस येणारे ऋतू,घडणाऱ्या खगोलीय आणि भौगोलिक घटनांशी प्राचीन लोकांनि जीवनाशी सांगड घातली आणि राशी,नक्षत्राचा प्रभाव आणि परिणाम सांगितल्या गेला.

ह्यातील अवैज्ञानिक भाग सोडला तर प्राचीन लोकाचा निसर्गाचा गाढ अभ्यास, निरीक्षण आणि अनुभव ह्याचे भरवश्यावर होता.आजही अनेक खगोल अभ्यासक राशी ,नक्षत्राचा संदर्भ म्हणून उपयोग करतात.नवतपा म्हणजे उच्च तापमानाचे नऊ दिवस.२५ मे ते ३ जून.नवतपा तापला तर मॉन्सूनचा पाऊस चांगला होतो असा आजवरचा अभ्यास आहे.भौगोलिक आणि वैद्न्यानिक भाषेत सांगायचे म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन होताना सूर्य एप्रिल ते जून ह्या तीन महिन्यात १३ ते २३.५० अक्षांसावर मध्य भारताच्या डोक्यावर असतो.(हेच ते शुन्य सावली दिवस असतात ).

म्हणजेच सूर्याची किरणे सरळ आपल्या भूभागावर पडतात आणि जमीन तापुन उष्ण हवा वाहू लागते.ह्या वेळेस राजस्तान,गुजरात कडून उष्ण वारे विदर्भ,मध्य भारताकडे वाहू लागतात आणि त्यामुळे आपल्या कडे ऊष्ण लहरी येऊ लागतात."नवतपा" हे त्यातील एक.सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो असे मानले जाते,परंतु त्यांनी ह्या ज्ञानाला ज्योतिषाशी जोडले आणि ग्रह ,ताऱ्याचा प्रभाव सांगायला सुरुवात केली.अवकाशातील वर्षे भराच्या मार्गावर २७ नक्षत्रे येतात.दर वर्षी त्या त्या वेळेस येणारे ऋतू,घडणाऱ्या खगोलीय आणि भौगोलिक घटनांशी प्राचीन लोकांनि जीवनाशी सांगड घातली आणि राशी,नक्षत्राचा प्रभाव आणि परिणाम सांगितल्या गेला. ह्यातील अवैज्ञानिक भाग सोडला तर प्राचीन लोकाचा निसर्गाचा गाढ अभ्यास, निरीक्षण आणि अनुभव ह्याचे भरवश्यावर होता.

आपण मागील तापमानाचे उच्चाक पाहिले तर बहुतेक वर्षी नवतपा तच सर्वाधिक तापमान ४८ आणी ४९ डिग्री सेल्सिअस होते.2020 मध्ये सुरवातीचा काळ पाऊस व ढगांमुळे कमी तापमानाचा गेला परंतु पुढे नवतपात तापमान वाढेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.नवतपा तापला तर मॉन्सूनचा पाऊस चांगला होतो असा आजवरचा अभ्यास आहे.भौगोलिक आणि वैद्न्यानिक भाषेत सांगायचे म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन होताना सूर्य एप्रिल ते जून ह्या तीन महिन्यात १३ ते २३.५० अक्षांसावर मध्य भारताच्या डोक्यावर असतो.(हेच ते शुन्य सावली दिवस असतात ).म्हणजेच सूर्याची किरणे सरळ आपल्या भूभागावर पडतात आणि जमीन तापुन उष्ण हवा वाहू लागते.

English Summary: May 25 to June 3 is the hottest day in Central India, let's find out in detail
Published on: 28 May 2022, 03:11 IST