News

अवकाळी पावसामुळे फक्त फळबागा तसेच मुख्य पिकांचे नुकसान न्हवे तर नगदी पिकातील कांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला खूप महत्व दिले जाते मात्र अवकाळीने पांढरा कांदा सुद्धा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी काढणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या जागेवर कांद्याची लागवड केली होते जे की त्याची पुनर्लागवडच करावी लागणार आहे त्यामुळे पांढरा कांदा लवकर बाजारात दाखल होणार नाही. बाजारात पांढरा कांदा लांबणीवर दाखल होईल अदा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Updated on 14 December, 2021 3:38 PM IST

अवकाळी पावसामुळे फक्त फळबागा तसेच मुख्य पिकांचे नुकसान न्हवे तर नगदी पिकातील कांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला खूप महत्व दिले जाते मात्र अवकाळीने पांढरा कांदा सुद्धा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी काढणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या जागेवर कांद्याची लागवड केली होते जे की त्याची पुनर्लागवडच करावी लागणार आहे त्यामुळे पांढरा कांदा लवकर बाजारात दाखल होणार नाही. बाजारात  पांढरा  कांदा लांबणीवर दाखल होईल असा  अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गादी वाफ्यावरील कांदा ‘सेफझोन’ मध्ये:-

कांद्याचे चांगल्या प्रकारे उत्पादन निघावे म्हणून त्याची लागवड गादी वाफ्यावर केली जाते यामुळे पाणी ही साचून राहते  आणि टन  व्यवस्थापन  सुद्धा करते. अवकाळी  पावसाचे  पाणी  जरी वाफ्यात साचून राहिले असले तरी याचा परिणाम कांद्यावर झालेला नाही मात्र साचलेल्या भागात लागवड केलेला जो कांदा आहे तो धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

नव्याने लागवड कराताना ही काळजी घ्यावी:-

आता नव्याने लागवड करण्यात येणारा कांदा गादी वाफ्यावर लावण्यात येणार आहे आणि तेच फायद्यात राहणार आहे. वाफ्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही यासाठी चर सुद्धा काढण्यात येणार आहे.रोपांची लागवड करताना सेंद्रिय खत तसेच गांडूळ खत मातीमध्ये टाकण्यात येणार आहे. १ किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति चौ. मीटर तसेच प्रति चौ.मीटर ला १० ग्राम निंबोळी पावडर या प्रमाणत मिसळून गाडी वाफे तयार करण्यात येणार आहेत.

असे करा रोपांचे व्यवस्थापन:-

वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे त्यामुळे कांद्याची रोपे जळत आहेत. त्यासाठी तुम्ही सिलिकॉन अधिक स्टिकर किंवा सुक्ष्म अन्नघटक म्हणून चिलेटेड झिंक 2 ग्रॅम पाण्यात मिसळावे आणि फवारणी करावी.

फवारणी करताना अशी घ्या काळजी:-

रोप लागवड झाल्यानंतर बरोबर १० दिवसांनी ११ टक्के झॅाक्सिस्ट्रोबीन तसेच १८.३ टक्के टेब्युकोनझोल, १० मिली क्विनॅाल फॅास किंवा १५ मिली क्लोरोपायरीफॅास १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. नंतर १५ दिवसांनी याचप्रमाणे फवारणी करावी.

तालुक्यात 300 हेक्टरावर पांढरा कांदा:-

अलिबाग तालुक्यात कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.मागील वर्षी २७० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली गेली होती. यावेळी कांद्याचे क्षेत्र वाढणार होते मात्र अवकाळी पावसामुळे आणि अनियमित वातावरणामुळे सरासरी क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

English Summary: Mattress steam is safe and beneficial for onions
Published on: 14 December 2021, 03:29 IST