News

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट यामुळे घडून आली आहे. याचाच परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्यातील फूल उत्पादनावर होताना दिसत आहे. फुलाच्या उत्पादनात कमालीची घट घडून आल्याने, त्यामुळे आता जिल्ह्यासमवेत संपूर्ण राज्यात फुलाचे दर चांगलेच वधारले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की फुलांचे दर हे मागच्या महिन्यापेक्षा दुपटीने वाढल्याची याची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी उत्पादनात कमालीची घट घडल्याने शेतकर्‍यांना वाढलेल्या दराचा फायदा होतांना दिसत नाही आहे

Updated on 17 December, 2021 11:38 AM IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट यामुळे घडून आली आहे. याचाच परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्यातील फूल उत्पादनावर होताना दिसत आहे. फुलाच्या उत्पादनात कमालीची घट घडून आल्याने, त्यामुळे आता जिल्ह्यासमवेत संपूर्ण राज्यात फुलाचे दर चांगलेच वधारले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की फुलांचे दर हे मागच्या महिन्यापेक्षा दुपटीने वाढल्याची याची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी उत्पादनात कमालीची घट घडल्याने शेतकर्‍यांना वाढलेल्या दराचा फायदा होतांना दिसत नाही आहे.

तसेच व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की लग्नसराई असल्याने मुलांच्या मागणी कमालीची वाढ झाली आहे आणि याचा पुरवठा होत नाहीय. बाजारात झेंडू समवेत इतर सर्व फुलांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे भाव चांगलेच वधारले आहेत. झेंडू प्रमाणे जरबेराचे दर देखील वाढले आहेत. राज्यात लग्नसराई ही चालू आहे, त्यामुळे मागणीत वाढ ही होतच आहे त्यामुळे व्यापारी आहेत की हा वाढलेला दर अजून किमान एक महिना तरी तसाच राहील. आधीच जरबराचे एक फूल पाच रुपयाला मिळत होते, ते आता चक्क दहा रुपयाला मिळत आहे. यावरून फुलाच्या किमती किती वधारल्या आहेत हे आपल्या लक्षात आले असेल.

अवकाळी मुळे फुलांना बसला होता फटका

गेल्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी मुळे जवळपास सर्व्याच पिकांना मोठा फटका बसला होता त्यामुळे उत्पादनात कमालीची घट नोंदवली गेली आहे. याचा परिणाम फुल शेतीवर देखील पाहायला मिळाला, अवकाळी पावसामुळे व त्यानंतर बदललेल्या हवामानामुळे फुलावर अनेक रोग अटॅक करू लागले यापैकीच एक रोग करपा हा देखील होता. करपा रोगामुळे फुलांची तोडणी करणेदेखील मुश्कील झाले होते. यामुळे अनेक हेक्‍टरवरील फुलशेती प्रभावित झाली आणि परिणामी उत्पादन हे कमी झाले.

बाजारातील फुलांच्या किमती

बाजारात सध्या रजनीगंधाची फुले शंभर रुपय किलोच्या वर विकली जात आहेत. झेंडूची फुले हे दोनशे रुपये किलोने विकले जात आहेत, मोगऱ्याची फुले देखील दोनशे रुपयाच्या दराने विकली जात आहेत. तर फुलाचा राजा गुलाब हे एक नग वीस रुपयाला विकले जात आहे. असेच काहीतरी वाढलेल्या किंमतीचा बळीराजाला तिळमात्रही फायदा होताना दिसत नाही आहे. रेड जरी दुपटीने वाढले असले तरी उत्पादन हे चांगलेच घटले आहे, म्हणुन वाढलेल्या दराचे फायदे हे फुल उत्पादक शेतकऱ्यांना होत नाही आहे.

English Summary: marriage season is coming and the flowers rate is increasing double but farmers still not happy what is the reason
Published on: 17 December 2021, 11:34 IST