भाजीपाला उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या काही भाज्यांचे दर तेजीत आहेत. काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (market committee) शेतमाल बाजारभावविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
काल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मटारची 17 क्विंटल आवक झाली. यासाठी किमान भाव 10 हजार रुपये तर कमाल भाव 16 हजार रुपये मिळाला आहे.
तसेच इतर भाजीपाल्याचे दर पाहिले तर तर शेवग्याची याठिकाणी 68 क्विंटल इतकी आवक झाली आहे. यासाठी किमान भाव 6 हजार तर कमाल भाव 12 हजार रुपये राहिला इतका राहीला आहे.
सावधान! सर्दी खोकला असू शकतो 'या' आजाराची लक्षणे
तसेच पावटा कमाल 7 हजार रुपये ढोबळी मिरची कमाल हजार रुपये वांगी कमाल 4 हजार 500, तसेच पापडी कमाल 5 हजार रुपये, गवार कमाल 6 हजार रुपये, आणि हिरवी मिरची कमाल 4 हजार रुपये असे दर आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाले आहेत.
नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त
एकीकडे भाजीपाल्यांचे दर दिलासा देणारे असल्याने शेतकरी (farmers) चिंतामुक्त पाहायला मिळत आहेत. दर वाढतील की स्थिर राहतील? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र दुसरीकडे सोयबिन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सोयाबीनदर घसरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
सिंह, कन्यासह या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन
LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा
Published on: 14 October 2022, 09:42 IST