सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण

23 May 2019 07:45 AM


मुंबई
: ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 

2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे:

  • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे.
  • पोहता येणे आवश्यक आहे.
  • किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधार कार्डधारक असावा.
  • संबंधित संस्थेच्या शिफारशीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा.
  • प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छिमारांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जून 2019 पर्यंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सागरी मत्स्य व्यवसाय Marine Fisheries fishery मत्स्यव्यवसाय वर्सोवा Versova fish मासेमारी
English Summary: Marine Fisheries Training

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.