गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहे. यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना फुलांना देखील बाजार नसल्याने शेतकरी चिंतेत होते, असे असताना आता मात्र शेतकऱ्यांच्या झेंडूला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे.
सध्या नवरात्री उत्सव सुरु होत असून यामध्ये फुलांना मोठी मागणी असते. सध्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतं फुलांनी बहरली आहेत. ही रंगीबेरंगी फुले अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर झेंडूच्या फुलाला 50 ते 70 रुपये प्रतिकिलो भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे येथील शेतकरी समाधानी आहे.
नवरात्री 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यामध्ये फुलांना मोठी मागणी असते. शेतकरी दरवर्षी फुलशेतीचे नियोजन करतात. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षीही मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड केली आहे. ज्याचा त्यांना फायदा होताना दिसत आहे.
ब्रेकिंग! 1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू होईल, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार सेवा सुरु
पुढे दिवाळीपर्यंत हे दर असेच रहावेत अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. मुंबईच्या दादर फूल मंडई आणि वाशीमध्येही याच फुलांची संख्या वाढताना दिसत आहे. . राज्यातील अनेक जिल्ह्यांतून येथे फुले येतात. गुलाबाचा तुकडा 20 रुपये तर मोगरा फुलाला 1000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. त्याचवेळी पुण्यात गुलाबाचा तुकडा ४० रुपयांना विकला जात आहे.
वीज बिल निम्म्याहून कमी येणार! फक्त 275 रुपयांचे हे उपकरण वीज मीटरजवळ ठेवा
यामुळे शेतकऱ्यांना दिवस मिळत आहे. नवरात्री, दसरा, दीपावलीमध्ये फुलांना अधिक मागणी असते आणि यंदा फुलांचे चांगले उत्पादन झाले आहे, यामुळे अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागल्याने शेतकरी आनंदात आहेत.
महत्वाच्या बातम्या;
Tractor Subsidy Scheme: सरकार देतंय ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, असा करा अर्ज
Farmar protest: शेतकरी संप सुरूच, कृषिमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
शेतकऱ्यांनो खेकडा पालन आहे उत्तम व्यवसाय, कमी खर्चात मिळतोय लाखोंचा नफा
Published on: 25 September 2022, 05:35 IST