News

पाटबंधारे विकास महामंडळानी 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देऊनही नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येत नसल्याने मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटला आहे. दरम्यान, या पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांनी भुमिका मांडली आहे. संजय शिरसाट म्हणाले की मराठवाड्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

Updated on 05 November, 2023 5:29 PM IST

पाटबंधारे विकास महामंडळानी 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देऊनही नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येत नसल्याने मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटला आहे. दरम्यान, या पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांनी भुमिका मांडली आहे. संजय शिरसाट म्हणाले की मराठवाड्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. आमच्या हक्काचं पाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देण्यात यावे. हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी आम्ही न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

नवीन धरण बनू नयेत अशी आमची मागणी आहे. नवीन धरणं झाल्यावर आणखी पाणी अडवले जाईल. पाणी मिळावे म्हणून आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही मागे पुढं पाहणार नाही.तर, सरकारला विनंती केली आहे की, आम्हाला रस्त्यावर उतरू देऊ नका असं शिरसाट म्हणाले. तसेच, मराठवाड्यातील नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून, आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही संजय शिरसाट यांनी केले आहे.

English Summary: Marathwada water issue MLA Shirsats warning to take to the streets
Published on: 05 November 2023, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)