News

बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी करत आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत घर आणि गाड्या पेटवून देण्यात आले होते, तोच आता आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली असून परिसरात धुराचे लोट दिसत आहे.

Updated on 30 October, 2023 5:25 PM IST

बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी करत आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत घर आणि गाड्या पेटवून देण्यात आले होते, तोच आता आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली असून परिसरात धुराचे लोट दिसत आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता बीड जिल्ह्यात उग्ररूप घेतल आहे. आज सकाळीच बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून गाड्या फोडून जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर जाळपोळ करणारे आंदोलक माजलगाव नगर परिषदेत पोहोचले. या जमावाने नगर परिषदेत जाळपोळ केली आहे. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी देखील घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

तसेच मराठा आंदोलक रास्ता रोको करत आंदोलन करत आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड, धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून, रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करत आहेत.

English Summary: Maratha reservation movement took a violence form; Majalgaon Municipal Council office fayer
Published on: 30 October 2023, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)