News

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन सारखी पिके तसेच उडीद,मूग सारख्या पिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसून अतोनात नुकसान झाले. परंतु खरिपातील तूर पीक हे उत्तम स्थितीत होते.

Updated on 27 November, 2021 9:25 AM IST

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस,  सोयाबीन सारखी पिके तसेच उडीद,मूग सारख्या पिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसून अतोनात नुकसान झाले. परंतु खरिपातील तूर पीक हे उत्तम स्थितीत होते.

.परंतु आता या पिकावर देखील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. शेतामध्ये डोलात उभ्या असणाऱ्या तूर पिकावरसुद्धा मर  रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. महागडी फवारणी करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांच्या हातात उरला आहे.

 यासाठी दूरगामी उपाययोजना करणे गरजेचे-

  • वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे किड, रोगराईचा प्रादुर्भाव हा दोन्ही हंगामात पिकांवर राहणार आहे.
  • त्यामुळे फवारणी साठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत आहे.
  • यावर कायमस्वरूपी उपाययोजना  म्हणून शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करतानाबियाणे मध्ये बदल करावा. बीडीन 711 व बिडीन716 या मर रोग  प्रतिबंधक जातीच्या वानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
  • पिकांची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे.
  • तूर पेरणी करण्यापूर्वी तुरीच्या बियाण्याला थायरम अधिक काबॅक्सिन पावर चार ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • तूर पिकामध्ये ट्रायकोडर्मा चार किलो प्रति हेक्‍टरी 200 लिटर पाण्यात फवारणी करावी. तुरीच्या खोडावर  फियटोपथोराब्लाइटचेकाळे ठिपके दिसताच रेडमी कोल्ड 25 ग्रॅम प्रति लिटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
  • बीजप्रक्रिया महत्त्वाचा भाग असून बियाण्याला बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी तर फायदा होईल.
English Summary: mar disease attack on pigeon pie crop for management do long term management
Published on: 27 November 2021, 09:25 IST