News

महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकरणामुळे नेहमीच पुढे राहिले असून औद्योगिकीकरणात अग्रेसर राज्य आहे.

Updated on 16 February, 2022 8:34 AM IST

महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकरणामुळे नेहमीच पुढे राहिले असून औद्योगिकीकरणात अग्रेसर राज्य आहे.

महाराष्ट्रामध्ये उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक  गुंतवणूकदारांनी पसंती दर्शविली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पुणे येथे केले.

 मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत मध्ये सुभाष देसाई बोलत होते. या परिषदेला सिरम इन्स्टिट्यूट चे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला,मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर चे अध्यक्ष सुधीर मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की महाराष्ट्राने कायम उद्योग विश्वाला उभारी  देण्याचे काम केले आहे.

जगातील विविध प्रकारच्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत असून  लॉकडाऊन नंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करून राज्याचेअर्थचक्र सुरू राहावे यासाठी हवी ती काळजी घेतली आहे. कोरोना कालावधीमध्ये सुद्धा देखील अनेक कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली असून 100 पेक्षा जास्त औद्योगिक करार झाले आहेत या माध्यमातून राज्यात अनेकांना रोजगार मिळाला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये सुलभता यावी यासाठी एक खिडकी योजनेत महा परवाना देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे उद्योग उभारण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने मिळणे सुलभ झाले आहे. 

या योजनेमुळे उद्योग क्षेत्रात चांगले वातावरण निर्माण झाले असून राज्यात असलेल्या शासकीय अभियांत्रिकी तसेच इतर कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे कुशल मनुष्यबळ देखील सहज उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी सिरम इन्स्टिट्यूट चे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांनी म्हटलेकी सिरम इन्स्टिट्यूट चे जगभरातील अनेक देशात काम सुरू असून कोव्हीशील्ड  लसीबाबत त्यांनी  माहिती दिली.

English Summary: many investor give preprence for to do investment in industries says subhash desai
Published on: 16 February 2022, 08:34 IST